Homeचिट चॅटअडसूळ ट्रस्ट शालेय...

अडसूळ ट्रस्ट शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेची गटवारी जाहीर

आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, सिबिईयु व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र तसेच कामगार दिनानिमित्त आजपासून सुरु होणाऱ्या विविध जिल्ह्यातील शालेय खेळाडूंच्या विनाशुल्क सांघिक सुपर लीग कॅरम स्पर्धेमधील १२ संघांची गटवारी जाहीर करण्यात आली आहे. साखळी अ गटात आनंदराव अडसूळ प्लॅटिनम, एमडीसी ज्वेलर्स, दिलीप करंगुटकर स्ट्रायकर्स; ब गटात गोविंदराव मोहिते फायटर्स, कॅ. अभिजित चँम्पियन्स, आत्माराम मोरे प्रतिष्ठान; क गटात सिबिईयु वॉरीयर्स, घोषचा फेअर प्ले, राजन राणे ऑप्टीशीयन्स आणि ड गटात सुमती क्वीन, अविनाश नलावडे स्पोर्ट्स, सुरेश आचरेकर फिनिशर्स संघांचा समावेश आहे.

शालेय प्रतिष्ठेची डीएसओ कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेपर्यंत उपक्रमांचे सातत्य कायम राखण्यासाठी को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ व क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक लीलाधर चव्हाण व प्रमोद पार्टे प्रयत्नशील आहेत. त्याअनुषंगाने जास्तीतजास्त स्पर्धात्मक सामने दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध शालेय खेळाडूंना सुपर लीग सांघिक कॅरम स्पर्धेद्वारे उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाडचे प्रसन्न व पुष्कर गोळे, शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे व स्वरा कदम, न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, महात्मा गांधी विद्यालयाची तनया दळवी, अँटोनियो डिसिल्व्हा हायस्कूलचा ध्रुव भालेराव, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, आयईएस सुळे गुरुजी शाळेची ग्रीष्मा धामणकर, आयएनजी इंग्लिश स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, श्री महावीर जैन इंग्लिश स्कूल-कल्याणची संचिता मोहिते, शारदाश्रम विद्यामंदिरचा सोहम जाधव, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर व अमेय जंगम, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे नील म्हात्रे, प्रसाद माने, देविका जोशी, सारा देवन आदी विविध जिल्ह्यामधील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूसह शालेय ३६ खेळाडूंचा कस लागणार आहे.

१ ते ४ मे दरम्यान दररोज सकाळच्या सत्रात मुंबईतल्या दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहामध्ये ही स्पर्धा होईल. साखळी ४ गटवारीमधून प्रत्येक गटातून पहिले दोन संघ प्रीमियर सुपर लीगसाठी पात्र ठरणार आहेत. पूर्णपणे विनाशुल्क असलेल्या कॅरम उपक्रमात शालेय खेळाडूंचा चषक, प्रमाणपत्र, टी शर्ट व स्ट्रायकर आदी पुरस्कारांनी गौरव होणार आहे.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content