Homeचिट चॅटअभिनेते-दिग्दर्शक रामकृष्ण गाडगीळ...

अभिनेते-दिग्दर्शक रामकृष्ण गाडगीळ ह्यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक रामकृष्ण गाडगीळ यांचे रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३, रोजी वयाच्या ७८व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

त्यांच्या निधनाने एक उत्कृष्ट अभिनेता, मार्गदर्शक आणि नाट्यदिग्दर्शक हरपल्याची भावना रंगभूमी, मालिका विश्वातील विविध मान्यवरांनी व्यक्त केली आहे. ‘प्रयोग मालाड’, ‘अमोघ मालाड’, ब्राह्मण सभा मालाड’, ‘अवतरण अकादमी मुंबई’ आदी संस्थांतून मुंबईच्या पश्चिम उपनगरात हौशी व प्रायोगिक नाट्यचळवळ सचेत राखण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आंतर-बँक एकांकिका स्पर्धेत बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व करून त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे.

व्यावसायिक रंगभूमीवर रामकृष्ण गाडगीळ यांनी भद्रकाली प्रॉडक्शन्स, सुयोग या संस्थांच्या वस्त्रहरण, ब्रह्मचारी, असा मी आसामी अशा विविध नाटकांमधून गाडगीळ यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या. त्याचप्रमाणे अनेक मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. क्राईम पेट्रोल, या हिंदी मालिकेमधील त्यांची चुकून पाकिस्तान हद्दीत गेल्यावर पाकिस्तान सैनिकांच्या तावडीत सापडलेल्या भारतीय नागरिकाची, “तुकाराम” या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती.

त्यांच्या मार्गदर्शनाने ऐंशी-नव्वदच्या दशकात अनेक नवोदित रंगकर्मी अशा संस्थांतून नाट्यकलेशी जोडले गेले व आज विविध माध्यमांत नावारूपाला आले आहेत. 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content