Homeचिट चॅट‘पेटीएम’वर करा हे...

‘पेटीएम’वर करा हे फीचर एक्टिवेट, मिळवा १०० रुपये कॅशबॅक!

पेटीएम पहिल्यांदाच पेटीएम युपीआय लाइट बॅलन्स कार्यान्वित केल्यास जवळपास १०० रूपयांची खात्रीदायी वेलकम कॅशबॅक देत आहे. पेटीएम अॅपवर युपीआय लाइट कधीच अयशस्वी न होणारी अत्यंत गतीशील पेमेंट्स करण्याची सुविधा देते.

युपीआय लाइटसह वापरकर्ते बँक व्यवहारांच्या मर्यादेबाबत चिंता न करता लहान मूल्य असलेले अनेक युपीआय पेमेंट्स करू शकतात. यामधून विनासायास पेमेंट्सचा अनुभव मिळतो. सुरक्षित ऑन-डिवाईस बॅलन्स यूपीआय लाइट दैनंदिन लहान मूल्याचे व्यवहार अत्यंत जलद करते, ज्यामुळे प्रत्येक पेमेंटसाठी युपीआय पिन क्रमांक प्रविष्ट करण्याची गरज दूर होते. कार्यान्वित झाल्यानंतर युपीआय लाइट वापरकर्त्यांना जवळपास २०० रूपयांपर्यंतचे त्वरित व्यवहार करण्याची सुविधा देते. यामधून जलद व एकसंधी अनुभव मिळतो. दिवसातून दोनदा अधिकतम २,००० रूपये युपीआय लाइटमध्ये भरता येऊ शकतात. त्यामुळे दररोज एकूण ४,००० रूपयांपर्यंत मूल्याचा वापर करता येऊ शकतो.

युपीआय लाइटचा वापर करत केलेले पेमेंट्स पासबुकला डि-क्लटर करतात. हे लहान मूल्याचे व्यवहार आता पेटीएम बॅलन्स व हिस्ट्री सेक्शनमध्ये दिसू शकतात. एनपीसीआयनुसार, वापरकर्त्यांना त्यांच्या बँकांकडून एसएमएसच्या रूपात युपीआय लाइटच्या माध्यमातून केलेल्या सर्व पेमेंट्सची दैनंदिन व्यवहार हिस्ट्री मिळेल. पेटीएम पेमेंट्स बँक युपीआयमधील सर्वात मोठी संपादनकर्ता व लाभदायी बँक म्हणून पहिल्या क्रमांकाची बँक असण्यासोबत आघाडीची रेमिटर बँकदेखील आहे. युपीआय पेमेंट्सच्या बाबतीत पेटीएम सर्वोच्च यशस्वी दर असलेली उद्योगातील सर्वात गतीशील बँक आहे. नवोन्मेष्काराला चालना देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा भाग म्हणून बँक युपीआय लाइट लॉन्च करणारी पहिली पेमेंट्स बँक आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक जानेवारी २०२३मध्ये १,७६५.८७ दशलक्ष व्यवहारांसह सलग २० महिन्यांसाठी सर्वात मोठी युपीआय लाभार्थी बँक राहिली, तसेच देशातील सर्व प्रमुख बँकांच्या अग्रस्थानी आहे. ३८९.६१ दशलक्ष नोंदणीकृत व्यवहारांसह एनपीसीआयच्या नवीन अहवालानुसार बँक युपीआय व्यवहारांसाठी अव्वल १० रेमिटर बँकांपैकी एक आहे. पीपीबीएल नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन (एनईटीसी) फास्टटॅगसाठी आघाडीची जारीकर्ता व संपादनकर्ता बँक आहे. जानेवारी २०२३मध्ये पीपीबीएलने इशुअर बँक म्हणून ५८.३४ दलशक्ष व्यवहारांची आणि अॅक्वायर बँक म्हणून ४७.७१ दशलक्ष व्यवहारांची प्रक्रिया केली.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content