Friday, October 18, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटगणपतीत प्रवाशांची लुटणाऱ्या...

गणपतीत प्रवाशांची लुटणाऱ्या 2186 खाजगी बसेसवर कारवाई

गणेशोत्सवाच्या काळात राज्यामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसची 6 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 2186 दोषी आढळल्या. या खाजगी बसेसवर कारवाई करून एकूण 93.96 लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्के अधिक राहणार नाही, अशा पद्धतीने कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. मात्र शासनाने विहीत केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी तपासणी करून दोषी वाहनांविरूद्ध प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कारवाई करतात. तसेच क्षेत्रीय कार्यालयातील वायुवेग पथकांमार्फतसुद्धा कारवाई करण्यात येते.

राज्यात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत 41 हजार 234 अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 11 हजार 148 वाहने दोषी आढळली. या कारवाईत 440.26 लक्ष इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच 207 परवाने निलंबित करण्यात आले असल्याचे परिवहन आयुक्त सुभाष धोंडे यांनी कळविले आहे.

Continue reading

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान! 23ला निकाल!!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या...
Skip to content