Homeब्लॅक अँड व्हाईटएसीटी फायबरनेटचे नवे...

एसीटी फायबरनेटचे नवे मोबाईल अॅप बाजारात

ब्रॉडबॅण्ड आणि डिजिटल सेवा उद्योगक्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी एसीटी (एसीटी) फायबरनेटने उद्योगक्षेत्रातील ग्राहकअनुभवाची व्याख्या नव्याने घडवू पाहणाऱ्या काही अभिनव वैशिष्ट्यांसह आपले मोबाईल अॅप बाजारात नव्याने दाखल केल्याची घोषणा केली आहे.

आपल्या ग्राहकांच्या वेळेचे मोल राखण्याशी आणि इंटरनेटशी संबंधित समस्यांवरील उपाययोजना अखंडितपणे पुरविण्याशी आपली बांधिलकी जपणाऱ्या एसीटी फायबरनेटने झटपट, सुलभ आणि सहजप्राप्य उपाययोजना ग्राहकांच्या हातांच्या बोटांशी आणून ठेवण्याच्या दृष्टीने तयार केलेले एसीटी सुपर अॅप बाजारात आणले आहे.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या तसेच यूजर्सच्या विस्तारत्या वर्गाच्या पावलांशी पावले जुळवित या ब्रॉडबॅण्ड ब्रॅण्डने आपल्या मोबाईल अॅपला संपूर्णपणे नवे रूप दिले आहे. विस्तृत संशोधन हाती घेत तसेच यूजर्सच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करून सुधारणेला कुठे वाव आहे हे समजून घेतल्यानंतर या नव्या अॅपची रचना करण्यात आली आहे व ते बाजारात आणण्यात आले आहे. एसीटी सुपर अॅपचा चेहरामोहरा संपूर्णपणे वेगळा आहे, ज्यामुळे यूजर्सना बिले भरणे, समस्येची नोंद करणे, अकाऊंट्सचा मागोवा घेणे, रिमाइंडर्स सेट करणे, ग्राहकसेवा विभागाशी संवाद साधणे, प्लान अपग्रेड करणे इत्यादी कामे करणे अधिक सोपे जाणार आहे.

एसीटी फायबरनेटचे चीफ मार्केटिंग आणि कस्टमर एक्स्पीरियन्स ऑफिसर रवी कार्तिक म्हणाले की, एसीटी फायबरनेटमध्ये आम्ही आमच्या सर्व संवादबिंदूंपाशी उत्कृष्ट दर्जाचा ग्राहकअनुभव पुरविण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. आमचे नविनीकृत अॅप आमच्या याच ध्येयधोरणाशी मेळ साधत ग्राहकांचे आयुष्य अधिक सुलभ आणि अधिक सोयीचे बनविण्याच्या हेतूने सुलभ स्वरूपातील युआय तसेच अकाउंट हाताळणी व सेल्फ-केअरशी संबंधित लक्षणीयरित्या सुधारित वैशिष्ट्ये पुरविते. याच्या साथीने आमच्या ग्राहकांना एसीटी अॅडव्हान्टेजचा अनुभव येईल आणि ते नव्या अॅपचा लगेचच स्वीकार करतील, याची मला खात्री आहे.

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content