Homeएनसर्कलकपिल पाटील आज...

कपिल पाटील आज करणार ‘निरोगी गावे..’ कार्यशाळेचे उद्घाटन!

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज, 18 जानेवारीला आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे ‘आरोग्यसंपन्न भविष्याच्या दिशेने निरोगी गावे’, या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन होईल.

पंचायती राज मंत्रालय (एमओपीआर) आंध्र प्रदेश सरकारच्या पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभागाच्या निकट सहकार्याने 18 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान संकल्पना 2: निरोगी गाव हा संकल्पनात्मक दृष्टिकोन स्वीकारून ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकास लक्ष्यांचे स्थानिकीकरण या विषयावर या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करत आहे.

चांगल्या सवयी; आरोग्याच्या मापदंडांवर देखरेख ठेवण्यासाठी पंचायतींची भूमिका, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपी) मध्ये ग्राम आरोग्य योजनेचे एकात्मीकरण, अनुकरणीय धोरणे, दृष्टिकोन, आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्सचे प्रदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असेल.

ही कार्यशाळा सहकार्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि निकोप भविष्याच्या उभारणीकरिता धोरण आखण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ प्रदान करते. शाश्वत विकास लक्ष्यांचे स्थानिकीकरण (एलएसडीजी) चे उद्दिष्ट जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी)चे स्थानिकीकरण करणे आणि तळागाळातील विशिष्ट आव्हाने आणि संधींना सामोरे जाणे हे आहे. एलएसडीजी ची संकल्पना 2 म्हणजेच निरोगी गाव ही आरोग्य आणि कल्याणावर भर देणाऱ्या खेड्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते.

संकल्पना 2: निरोगी गाव या प्रतिष्ठित राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित झालेल्या पंचायतींनाही तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Continue reading

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...
Skip to content