पश्चिम रेल्वेच्या मुंबईतल्या बोरीवली स्थानकाबाहेरील जुन्या डब्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्याला ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ असे नाव देण्यात आले आहे. स्थानिक संस्कृतीच्या आधारे या रेस्टॉरंटची सजावट करण्यात आली आहे. नमकीन आणि मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या हल्दीरामने या रेल्वे डब्यात आपले रेस्टॉरंट उघडले आहे. हे ‘हल्दीराम एक्सप्रेस रेस्टॉरंट’ म्हणूनही ओळखले जाईल.
रेस्टॉरंटमध्ये एक भव्य डायनिंग हॉल बांधण्यात आला आहे. उत्तर आणि दक्षिण भारतासह सर्व प्रकारचे पदार्थ यामध्ये उपलब्ध असतील. हल्दीराम एक्सप्रेस रेस्टॉरंटमध्ये विशेष आसनव्यवस्था आहे. हल्दीराम
फुड्स इंटरनॅशनलचे संचालक नीरज अग्रवाल यांनी सांगितले की, रेल्वे वाहतुकीच्या सुरुवातीच्या काळात सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक सुविधा ट्रेनमध्येच उपलब्ध असतील. तसेच जेवणाच्या ताट, नाश्ता इत्यादी २४ तास उपलब्ध असतील.
उपाहारगृहातील कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतील. आईस्क्रीम, भारतीय पदार्थ, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ रात्री 3 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात वापरण्यात येणारे डबे अनुभवायला मिळतील. यामध्ये जुन्या ट्रेनमध्ये असलेल्या राजेशाही साधनांचा आस्वाद घेण्याचा अनुभव मिळणार आहे. तरुणांना या अनुभवाची ओळख करून देण्यासाठी रेल्वेच्या डब्यात एक रेस्टॉरंट तयार करण्यात आले आहे. नीरज अग्रवाल म्हणाले की, हे रेस्टॉरंट केवळ शहरी लोकांसाठीच नाही तर प्रवाशांसाठीही अतिशय उपयुक्त ठरेल.