Details
कोणत्याही क्षणी युद्धाची घोषणा?
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
14 फेब्रुवारी हा जगाच्या दृष्टीने प्रेमाच्या संताचा दिवस जरी असला तरी भारतासाठी तो यापुढे पुलवामा दिवस म्हणूनच गणला जाणार आहे. देशाच्या भावना उंचबळून गेल्या आहेत. लोक अजूनही शोकसंतप्त आहेत. पहिल्या दोन-तीन दिवसात तर, “चला! आताच पाकवर हल्ला करा!” अशी जनभावना जाणवत होती. एक धक्का और दो, पाकिस्तान गिरा दो.. अशी युद्ध-घोषणा सर्वत्र दुमदुमत होती. लोक संतापाने वेडेपिसे झाले होते. आता त्या घटनेला दहा दिवस उलटून गेले आहेत. मागच्या वेळी ऊरीमध्ये लष्करी छावणीवर पाकपुरस्कृत अतिरेक्यांनी जो हल्ला केला होता त्यानतंरही जनभावना अशीच पेटून उठली होती आणि त्यावेळेस भारतीय लष्कराने पाकिस्तानवर अचानक, चकित करणारा सर्जिकल स्ट्राईक नामक आघात केला होता. पाक लष्कराच्या मदतीने भारतात घुसण्यासाठी तयारीत असणाऱ्या दहशतवाद्यांचे तळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेव्हा लष्कराने उद्ध्वस्त केले होते. तशाच प्रकारचा दणका याहीवेळी दिला जाईल अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. आजही तशीच काहीतरी कृती जनतेला अपेक्षित आहे.
पंतप्रधानांनी सांगितलेच आहे की कृती करण्याची जागा, वेळ व पद्धती निवडण्याचे स्वातंत्र्य लष्कराला दिलेले आहे. त्यांनी ठरवायचे आहे. याशिवाय दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठिराख्या पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची भाषा भारत सरकारने केली आहे. पण युद्धशास्त्राचा नियमच आहे की एकच हत्यार वारंवार वापरता येत नाही. २०१६ मध्ये केलेला सर्जिकल स्ट्रार्ईक यशस्वी ठरला होता कारण त्यात एक सरप्राईज एलिमेंट होते. ती अचानक केलेली कृती होती. शत्रू बेसावध सापडला होता. त्यांना पूर्वकल्पना नसल्यामुळे जो आश्चर्याचा धक्का बसला त्यातून सावरण्याच्या आधीच कारवाई पूर्ण करून जवान परतही आले होते. आता दुसऱ्या वेळी तेच सरप्राईज एलिमेंट असणार नाही. कारण भारत असे काही करू शकतो याची कल्पना आता अतिरेक्यांना व पाक लष्करालाही आलेलीच आहे. त्यामुळे त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच सीमेजवळ भारतात घुसण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना पाक हद्दीत आतल्या बाजूच्या लष्करी तळांवर हलवल्याची माहिती आली आहे.
भारतापुढे आता कठोर कारवाईचे जे मार्ग शिल्लक आहेत त्यातील काहींवर अंमलबजावणी सुरूही झाली आहे. पाक सरकारवरचा आतंरराष्ट्रीय दबाव वाढण्याचे काम आपण जोरात सुरू केले आहे. १४ तारखेनंतर लगेचच अमेरिका, इंग्रंड, फ्रान्स, अर्जेंटिना, जपान, अशा अनेक देशांच्या उच्च व अतिउच्च स्तरावर भारताने संपर्क साधला आणि पाकच्या आगळिकीच्या तक्रारी केल्या. पॅरीस, बर्लीन, जीनिव्हा, जिथेजिथे आंतरराष्ट्रीय परिषदा सुरू होत्या तिथे भारताने दहशतवादाविरोधात व त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानविरोधात जोरदार बाजू मांडली. भारताची बाजू जगाला पटलेली आहे हेही स्पष्ट झाले. दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी जो आंतरराष्ट्रीय सामंजस्य कार्यक्रम सुरू आहे तेथे पाकिस्तानला दहशदवादी राष्ट्र ठरवण्याचे आणखी एक पाऊल टाकले गेले. ग्रे यादीमधून बाहेर निघण्याची पाकची जोरदार धडपड पाहयला मिळत आहे. पण हाफीज सईदच नव्हे तर जैश ए मुहंमदचा बाप मसूद अझरलाही बेड्या ठोकण्याचे काम पाकिस्तानला करून दाखवावे लागेल व तेही फेब्रुवारी संपण्याच्या आधी. पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतामधील बहवालपूर हा जैश व मसूद अझरचा अड्डा आहे. तेथील त्याच्या काही शाळा कालच पाकने ताब्यात घेतल्या आहेत. पण मसूदला तिथून हलवून लष्कराने गुप्त ठिकाणी सुरक्षेत ठेवलेले आहे असेही पुढे आले आहे. जगाच्या डोळ्यात धूळ टाकण्याचे पाकचे प्रयत्न सुरू आहेत व भारत ते रोजच्या रोज उघडे पाडत आहे. पळण्याच्या व अतिरेक्यांना आसरा देण्याच्या पाकच्या सर्व मार्गांवर जागतिक नाकेबंदी बसवण्याची भारताची मोहीम यशाकडे सरकते आहे.
पण त्याशिवाय भारताकडे लष्करी कारवाईचा उपाय आहेच. त्याबाबतचे पत्ते अर्थातच सरकारने उघड केले नाहीत. काय करायचे? कसा आघात करायचा? हे लष्करानेच ठरवायचे असले तरी, काहीतरी शिजते आहे, हे समजते. क्रिया आणि प्रतिक्रिया यातून थोडीफार कल्पना येऊ शकते. पाकिस्तानी लष्कराने सीमेपलीकडे धावपळ सुरू केली आहे. त्यातून भारतीय लष्कर हल्ला करण्याच्या तयारीत आहे असा निष्कर्ष जगाने काढला आहे. पकिस्तानने सीमेवरची गावे रिकामी करण्यास सुरूवात केली आहे. सीमेजवळच्या लष्करी रूग्णालयांना जय्यत तयारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि पाकिस्तानी सीमावर्ती गावे व शहरांतील खाजगी रूग्णालयांना सांगण्यात आले आहे की पाक जवानांच्या उपचारांना प्राधान्य द्यावे लागेल. आपल्याकडेही कच्छ भागातील सीमेवरची गावे रिकामी करण्याच्या तयाऱ्या सुरू झालेल्या आहेत अशा बातम्या येत आहेत. कारवाईची घटिका जवळ आलेली दिसतच आहे!
पंतप्रधान नेरंद्र मोदींच्या अत्यंत विश्वासातील मंत्री आहेत वित्तमंत्री अरूण जेटली. त्यांनी कालच दिल्लीत एक भाषण जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार व उद्योगपतींच्या सभेत केले. जेटली म्हणाले की, भारत पाकिस्तान दरम्यान युद्ध झाले तर ते एखाद्या आठवड्यात संपेल असे काही म्हणतात. पण युद्ध हा एक पर्याय आहे. आपल्याला आता दहशतवादी पाकिस्तानचे कंबरडे मोडावे लागेल. जिंकण्यासाठीच युद्ध करावे लागेल. लष्करी कारवाईशिवाय आणखीही आर्थिक नाकेबंदीचे जे उपाय आहेत ते आपले सरकार लागू करतच आहे. त्यांच्या बोलण्यातील एखाद्या आठवड्याच्या युद्धाचा जो उल्लेख आला त्याने अनेक मंडळी सावरून बसली. त्यांनी अर्थातच असे कुठेही म्हटले नाही की भारत युद्ध पुकारेल वगैरे.. पण, एखाद्या आठवड्याच्या युद्धाचा, त्यांनी केलेला उल्लेख पुरेसा ठरला. जर युद्ध होणारच असेल तर ते किती व्यापक असेल व त्याचे कायकाय परिणाम संभवतात याचा विचार अर्थातच मोदी, जेटली, राजनाथ सिंह, गडकरी, शाह आदि सरकारची म्होरके मंडळी नक्कीच करत असतील. पण जर आणि जेव्हा, युद्ध होईल, त्याची मोठी किंमत दोन्ही देशांना चुकवावी लागेल हेही स्पष्ट आहे.
यानिमित्ताने याआधीच्या भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या चार युद्धांतील वित्त व जीवित हानीच्या हकीकती आठवणे क्रमप्राप्त आहे. दुसरे हे युद्ध जितके युद्धभूमीवर लढले जाईल तितकेच ते ट्वीटर व इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांतही लढले जाईल. कारण पुलवामानंतर गप्प बसलेले विरोधी पक्षनेते आता जागे झाले आहेत. सुरूवातीला सरकारच्या मागे व लष्कराच्या मागे देश एकसंघपणाने उभा आहे असे म्हणणाऱ्या राहुल गांधी, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी आदींनी सरकार व मोदींच्या विरोधात ट्विटर युद्ध सुरू केले आहे. हॅशटॅगच्या मोहिमा सुरू झाल्या आहेत. सात-आठ दिवस उलटल्यानंतर आता विरोधी पक्षांनी कुरकुर सुरू केली आहे. पुलवामाचे अतिरेकी मोठ्या प्रमाणात स्फोटके आणूच कसे शकले? ही स्फोटके आली कोठून? अशाप्रकारची काही योजना अतिरेकी आखत आहेत हे लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाला, केंद्र सरकारच्या आयबी अथवा रॉला अथवा स्थानिक पोलिसांना का कळू शकले नाही? असे प्रश्न विचारताना काँग्रेसने हे केंद्र सरकारचे अपयश आहे असा सूर लावला आहे. जेव्हा पुलवामामध्ये सीआरपीएफचे जवान मारले गेले तेव्हा मोदी कुठे होते, ते बराच काळ गप्प का राहिले असाही एक दाहक सवाल काँग्रेसने केला आहे. पुलवामानंतर सर्वात आधी काँग्रेस नेत्यांनी, भाजपा अध्यक्षांनी, अन्य काही केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी ट्वीटरवरून त्या घटनेचा निषेध केला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेच्या निषेधाचे तसेच या घटनेविषयी संताप व्यक्त करणारे ट्वीट का केले नाही? असे सवाल विचारतानाच काँग्रेसने मोदींच्या प्राधान्यक्रमांविषयीचे सवाल उपस्थित केले आहेत. जेव्हा घटना घडली तेव्हा पंतप्रधान जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये एका माहितीपटाच्या चित्रिकरणात गुंग होते आणि ते पूर्ण झाल्यानंतरच ते पुलवामाची माहिती घेऊ लागले असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावरून सध्या राजकारण तापले आहे.
भारत व पाकिस्तानदरम्यान आतापर्यंत मोठी युद्धे झाली. १९४८, १९६५ मध्ये १९७१ मध्ये आपल्या दोन देशांमध्ये लष्करी संघर्ष झ़ाले. १९९९ मध्ये कारगीलची लढाई झाली. या सर्व चारही युद्धात भरातानेच विजय मिळवला आहे. त्यात पाकचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे जवान तर अधिक प्रमाणात मारले गेलेच पण आर्थिक फटकाही त्यांना मोठा बसला. १९७१च्या युद्धात तर पूर्व पाकिस्तानचे रूपांतर भारताने बांगला देशात करून टाकले! पाकचा नकाशाच बदलला गेला. पाकचा मोठा लचका तोडला गेला. त्यानंतरच काश्मीरमध्ये अतिरेकी घुसवून भारताविरोधात दररोजची लढाई पाकने सुरू केली. ती आजपर्यंत सुरूच आहे. १९७१च्या बांगला मुक्तीच्या युद्धात पाकचे सात हजार नऊशे सैनिक भारतीय जवानांनी ठार केले आपल्याही ३८०० जावानांचे प्राण आपण गमावून बसलो. पण जनरल नियाझीच्या नेतृत्त्वाखालील पूर्व पाकिस्तानी ९० हजार सैनिकांना भारताने युद्धकैदी बनवले. ती सर्वात मोठी हार पाकसाठी ठरली होती.
युद्धाचा खर्च मोठा असतो. त्याचा अर्थव्यवस्थेवर येणारा ताणही मोठाच असतो. कारगील युद्धाचा भारतावरचा बोजा होता जवळपास चार हजार दोनशे साठ कोटी रूपयांचा, तर पाकिस्तानलाही तीन एक हजार कोटींचा खर्च त्यात करावा लागला होता. पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला होता. त्यानंतर सीमेवरचा तणावही मोठ्या प्रमाणात वाढला होता. भारत पाक सीमेवर रोजच्या रोज चकमकी घडत होत्या. त्यात जवानांचे मृत्यूही होत होते. ते मानवी नुकसान व आर्थिक नुकसानही मोठेच होते. पाकिस्तान हा जो दहशतवादाचा खेळ रचत आहे त्यात त्या देशाचे नुकसान प्रचंड होते. जवळपास ४२ हजार कोटी रूपये पाकिस्तान आपल्या देशात व परदेशातील दहशतवाद्यांवर तसेच आयएसआयवर खर्च करत आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या सुमारे अडीच टक्के रक्कम लष्करावर खर्च होते. तर पाकच्या बाबतीत हे प्रमाण आहे दहा ते ११ टक्के. म्हणजेच तिथे सर्वसामान्य नागिरकांच्या सुखासमाधानासाठी नाही. आरोग्य, शिक्षण, रस्ते अशा बाबींवर नाही, तर बंदुकांवर व हाफीज आणि मसूदच्या टोळक्यांवरच खर्च केला जात आहे. त्यातून त्यांना काय साधता येणार हा प्रश्नच आहे. खरेतर त्यांच्या हाती काहीच लागणार नाही. भारताचा अविभाज्य भाग असणारा काश्मीर त्यांना अशा रक्तपाताने मुळीच मिळणार नाही. उलट भरातीय लष्कराच्या एक ठोशात तो देश मात्र गळपाटून जाईल. नष्ट होऊ शकेल.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी