HomeArchive`नवाकाळ'चे अभिनंदन!

`नवाकाळ’चे अभिनंदन!

Details
`नवाकाळ’चे अभिनंदन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या भिम पराक्रमामुळे `अभिनंदन’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अभिनंदन हे शौर्य गाजविणाऱ्यांचे करायचे असते. पराक्रम करणाऱ्यांचे करायचे असते. इतिहासात आपली कर्तबगारी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणाऱ्यांचे करायचे असते. या पार्श्वभूमीवर या तीनही निकषांच्या कसोटीस उतरणाऱ्या दै. `नवाकाळ’चे आम्ही आज मन:पूर्वक अभिनंदन करीत आहोत.

`नवाकाळ′ सुरू होऊन आज 97 वर्षे झाली आहेत. आणखी तीन वर्षांनी `नवाकाळ′ शतक महोत्सव साजरा करील. या प्रदीर्घ प्रवासात `नवाकाळ’चे संस्थापक नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि त्यांच्या वारसदारांनी केलेली कामगिरी अभूतपूर्व अशीच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी `नवाकाळ′ सुरू केला तेव्हा परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. देशात इंग्रजांचे राज्य होते. त्या राजवटीविरूद्ध `ब्र’ काढणे म्हणजे प्राणघातक संकटास आमंत्रण देणे होते. पण हे आव्हान स्वीकारून खाडीलकरांनी `नवाकाळ′ सुरू केला आणि ब्रिटिशांच्या जुलूमी राजवटीविरूद्ध आवाज बुलंद करीत तो चालवला. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव य. कृ. तथा आप्पासाहेब खाडीलकर यांनी तो तितक्याच नेटाने, जिद्दीने आणि परिश्रमपूर्वक सुरू ठेवला.

वर्तमानपत्र चालविणे हे तेव्हा सतीचे वाण मानले जात होते. त्यावेळी भांडवलदारांची वर्तमानपत्रे नव्हती. ध्येयवादी वृत्तपत्रांचा तो काळ होता. त्या काळातच `नवाकाळ’चा उदय झाला आणि प्रतिकूल परिस्थितीत तो पाय रोवून उभा राहिला. आप्पासाहेबांचे कर्तबगार चिरंजीव निलकंठ खाडीलकर यांनी `नवाकाळ’ची सूत्रे स्वीकारेपर्यंत `नवाकाळ′ अक्षरश: डबघाईला आला होता. तो बंद पडण्याच्या मार्गावर होता. पण `नवाकाळ′ वाढविण्याचे आव्हान निळूभाऊ खाडीलकरांनी दमदारपणे स्वीकारले. पुढे काही वर्षातच त्यांनी हे आव्हान यशस्वी करून दाखविले.

. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे यांच्या लेखणीच्या बळावर दै. `मराठा’ प्रचंड लोकप्रिय झाला होता. तेव्हा आचार्य अत्रेंना संयुक्त महाराष्ट्र लढ्याची अनुकूल पार्श्वभूमी लाभली होती. दुर्दैवाने आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर काही वर्षातच ‘मराठा’ बंद पडला. त्यामुळे मराठी वृत्तपत्रसृष्टीत फार मोठी उणीव निर्माण झाली. ती उणीव निळूभाऊंच्या संपादकत्वाखालील `नवाकाळ’ने भरून काढली. निळूभाऊंचे अग्रलेख गाजू लागले. त्यांच्या परखड अग्रलेखांमुळे `नवाकाळ’चा खप झपाट्याने वाढू लागला. भांडवलदारांच्या वर्तमानपत्रांशी सामना देणे हे अजिबात सोपे नव्हते. पण आपल्या लेखणीच्या बळावर निळूभाऊंनी ते सोपे करून दाखविले. म्हणूनच वाचकांनी त्यांना `अग्रलेखांचे बादशहा’ हा किताब प्रेमाने बहाल केला. या बादशहाला शोभेल अशीच पत्रकारिता निळूभाऊंनी वर्षानुवर्षे केली. कोणत्याही मुख्यमंत्र्याचा अथवा मंत्र्याचा मुलाहिजा न बाळगता ते जनतेच्या बाजूने लिहित राहिले. गोरगरीब जनतेचा आवाज बुलंद करीत राहिले.

1982 साली सुरू झालेल्या गिरणी कामगार संपाच्या काळात तर `नवाकाळ′, `संध्याकाळ′ आणि `शिवनेर’ या वर्तमानपत्रांनी ऐतिहासिक कामगिरी केली. निळूभाऊंनी आपल्या लेखणीच्या बळावर गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला. लुटारू गिरणीमालक कामगारांची देणी देण्याचे टाळत होते. पण तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याशी यशस्वी वाटाघाटी करून निळूभाऊ खाडीलकर यांनी गिरणी कामगारांना त्यांची कोट्यवधी रुपयांची देणी मिळवून दिली. `नवाकाळ′ यशस्वी करण्यासाठी निळूभाऊंनी कठोर तपश्चर्या केली. रात्रीचा दिवस करून ते परिश्रमपूर्वक राबले. डोळयात तेल घालून त्यांनी `नवाकाळ′ वाढविला. पुढे `नवाकाळ’चे संपादकत्व त्यांनी आपल्या द्वितीय कन्या जयश्री खाडीलकर यांच्याकडे सोपविले. तसेच `संध्याकाळ’च्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी आपल्या तृतीय कन्या रोहिणी खाडीलकर यांच्यावर टाकली. त्यांच्या या दोन्ही कन्या आजही दोन लोकप्रिय वर्तमानपत्रे यशस्वीपणे चालवित आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जयश्री खाडीलकर पांडे यांच्या संपादकत्वाखालील `नवाकाळ’चा 97 वा वाढदिवस साजरा होत आहे हादेखील एक मोठा योगायोग आहे. `नवाकाळ’चे पुन्हा एकदा अभिनंदन करीत असताना आम्ही `नवाकाळ’च्या शतकी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा देत आहोत.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content