Details
तुम्ही हे वाचायलाच हवे..
31-Aug-2019
”
हेमंत जोशी, ज्येष्ठ पत्रकार
Hemant.offtherecord@gmail.com
जेव्हा तुम्हाला आक्रमक पत्रकारिता करायची असते, ती करताना काही पथ्ये पाळणे, काहींबाबतीत सावध असणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा राजकीय क्षेत्रात काही व्यक्ती जे तुमच्यावर टपलेले असतात, क्षणार्धात तुम्हाला नेस्तनाबूत करून मोकळे होतात. शोधपत्रकारितेत जेव्हा एखाद्याविषयी तुम्ही चांगले लिहिता तेव्हा पैसे मिळाले असतील, असेच म्हटले जाते किंवा जेव्हा अमुक एखाद्यावर टीका करता तेव्हा पैसे मिळाले नसतील, असे पसरविले जाते किंवा हे असेच एखाद्या आक्रमक, शोधपत्रकारिता करणाऱ्यांकडून घडत असेल तर ते नक्की अतिवाईट असते. असे घडता काम नये, बदनामी करणे लोकांचे कामच असते त्याकडे वाईट काम करून पैसे न मिळविणाऱ्या पत्रकारांनी अजिबात लक्ष द्यायचे नसते.
माझी पत्रकारिता सुरूवातीपासूनच आक्रमक स्वरूपाची. तशी ती माझ्या समकालीन अनेकांची होती. पण, ते टिकले नाहीत. कारण, पैसे दे नाहीतर लफडी काढतो पद्धतीची त्यांची पत्रकारिता होती. अर्थात ती नावे येथे मला सांगायची नाहीत. मी टिकलो, कारण माझ्या ते अगदी सुरूवातीला लक्षात आले की हे असे आपल्याबाबतीतदेखील नक्की घडू शकते. त्यामुळे मी नियमित, तेही व्हाइट अशी गुंतवणूक करीत गेलो, ज्याचे सुमधुर फळ मला चाखायला मिळाले. पुढल्या पिढीने ते टिकवून ठेवले तर त्यांनाही ही सुमधुर फळे नक्की चाखायला मिळणार आहेत.
१९८० ते आजपर्यंत आर्थिकदृष्ट्या माझ्या आयुष्यातला अत्यंत कसोटीचा काळ फक्त १९८७ दरम्यान आला होता. माझी एकेठिकाणी आर्थिक गुंतवणूक अडचणीत आल्याने मी अक्षरश: रस्त्यावर आलो होतो. पुढली पत्रकारिता करण्यासाठी मग मला जळगाव सोडून नेसत्या कपड्यानिशी कायम मुंबईत यावे लागले. अगदी काही कुटुंब सदस्यांनी तर मला त्यांच्याकडे कुठल्याशा सणानिमित्त गेल्यानंतर घराबाहेर काढले होते. पण, हार मानणे माझ्या स्वभावात नव्हते. पुढल्या वर्षभरात गेलेले पैसे मिळाले. वैभव महालक्ष्मी व गणपतीच्या आशीर्वादाने पुन्हा प्राप्त झाले. अमुक एखाद्याने आपल्याला संकटात मदत केली तर त्याची आयुष्यभर जाणीव ठेवायची, माझा तो स्वभाव आहे. १९८७ मध्ये जेव्हा मुंबईत आलो तेव्हा त्यावेळेचे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकरचे आमदार सुबोध सावजी यांनी मला त्यांच्या आमदार निवासाच्या खोलीत आश्रय तर दिलाच पण मुंबईतील पहिले पाक्षिकदेखील मी त्यांच्याच निवासी खोलीतून काढले होते. पुढे सुबोध सावजी राज्यमंत्री झाले आणि त्यांचे लक्ष नको त्याठिकाणी नको त्याबाबतीत अडकले, म्हणून त्यांच्यावर एकदा हलकीशी टीका केली जी त्यांना खूप झोंबली असावी.
एक दिवस मी आणि माझे धाकटे बंधू अगदी सहज त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला अतिशय खालच्या पातळीवर येऊन झाप झाप झापले. मी त्यांना एवढेच म्हणालो, तुम्हाला राजकारणात टिकायचे असेल तर या पद्धतीने तुम्ही वागता कामा नये, त्यांनी माझे सांगणे निगेटिव्ह पद्धतीने घेतले. पुढे माझे म्हणणेच खरे ठरले. जंग जंग पछाडूनदेखील १९९५नंतर सुबोध सावजी ना मंत्री झाले ना आमदार म्हणून कधी निवडून आले. ते त्यादिवशी अद्वातद्वा बोललेत खरे पण मी मनात राग ठेवला नाही. कारण मला कधी राग येतच नाही. फार कमी वेळा माझा बोलण्यातून तोल जातो. लिखाणासारखे दुधारी शस्त्र हाती असताना आपण कशाला तोंडाची वाफ गमवायची?
मला वाटते.. असे माझ्याबाबतीत अनेकदा घडते की अमुक एखाद्या नेत्याला, मंत्र्याला, अधिकाऱ्याला, पत्रकाराला अत्यंत महत्त्वाचे म्हणजे कुटुंब सदस्यांना, नातेवाईकांना काही चांगले सांगायला जावे, तर ते त्यातून वेगळे वाईट अर्थ काढून मोकळे होतात. पुढे नुकसान त्यांचेच होते. अगदी मुलांनादेखील अमुक करू नका सांगतो ते ऐकतीलच असे नसते. पुढे त्यांना फटका बसला की मग ते आपणहून सांगायला येतात की तुमचे त्यावेळी ऐकायला हवे होते. वयाच्या थेट १६व्या वर्षी मी घरातून, गावातून, कुटुंबातून बाहेर पडलो आणि मजल दरमजल मारत येथपर्यंत पोहोचलो. दररोज आजतागायत जगातले बरेवाईट अनुभव घेत आल्याने त्यावर विचारमंथन करीत पुढेपुढे सरकल्याने समाजातले, आयुष्यातले नेमके कळते त्याचा आधार घेत, कधी प्रत्यक्ष भेटून एखाद्याला समजावून सांगतो तर कधी लिखाणातून अमुक एखाद्याची चूक, मग तो कितीही ताकदवान असला तरी लिहून मोकळा होतो.
आपली आर्थिक स्थिती, आपली वृत्ती, आपले पाप, आपले शिक्षण, घरातले वातावरण, व्यसने हे सारे बहुतेक भारतीय लपवून ठेवतात. एक ना एक दिवस ते नक्की बाहेर पडते. त्यातून मोठे नुकसान होते. मी मराठी माध्यमातून सेकंड क्लासमध्ये पास झालो हे सांगण्यात मला कधीही लाज वाटली नाही. सुब्रमण्यम स्वामी, सोनिया गांधी यांच्याबाबतीत थेट पुरावे सादर करून नेमके तेच म्हणाले होते की ही बाई फक्त पाचवा वर्ग पास असताना का म्हणून सांगते की तिने केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे, मुखवटा व नेमका चेहरा यात तफावत ठेवल्यानेच आयुष्याच्या संध्याकाळी शरद पवारांना हे असे लाजिरवाणे राजकीय आयुष्य काढावे लागत आहे. राजकारणात हारजीत नक्की होत असते पण पवारांची हार त्यापद्धतीची नाही. त्याला भीषण वास्तवाच्या राजकीय कंगोऱ्यांनी वेढलेले आहे जे अत्यंत वाईट आहे. ज्यांना पवारांनी सर्वच क्षेत्रात केवळ पाप मार्गाने मोठे केले ते सारे त्यांना सोडून गेले किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे खादाड बिळात जाऊन लपले आहेत. हे घडायला नको होते. पण पवारांनी चांगल्या मित्रांचे कधी ऐकलेच नाही. दुर्दैवाने.. ”
“हेमंत जोशी, ज्येष्ठ पत्रकार”
Hemant.offtherecord@gmail.com
“जेव्हा तुम्हाला आक्रमक पत्रकारिता करायची असते, ती करताना काही पथ्ये पाळणे, काहींबाबतीत सावध असणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा राजकीय क्षेत्रात काही व्यक्ती जे तुमच्यावर टपलेले असतात, क्षणार्धात तुम्हाला नेस्तनाबूत करून मोकळे होतात. शोधपत्रकारितेत जेव्हा एखाद्याविषयी तुम्ही चांगले लिहिता तेव्हा पैसे मिळाले असतील, असेच म्हटले जाते किंवा जेव्हा अमुक एखाद्यावर टीका करता तेव्हा पैसे मिळाले नसतील, असे पसरविले जाते किंवा हे असेच एखाद्या आक्रमक, शोधपत्रकारिता करणाऱ्यांकडून घडत असेल तर ते नक्की अतिवाईट असते. असे घडता काम नये, बदनामी करणे लोकांचे कामच असते त्याकडे वाईट काम करून पैसे न मिळविणाऱ्या पत्रकारांनी अजिबात लक्ष द्यायचे नसते.”
“माझी पत्रकारिता सुरूवातीपासूनच आक्रमक स्वरूपाची. तशी ती माझ्या समकालीन अनेकांची होती. पण, ते टिकले नाहीत. कारण, पैसे दे नाहीतर लफडी काढतो पद्धतीची त्यांची पत्रकारिता होती. अर्थात ती नावे येथे मला सांगायची नाहीत. मी टिकलो, कारण माझ्या ते अगदी सुरूवातीला लक्षात आले की हे असे आपल्याबाबतीतदेखील नक्की घडू शकते. त्यामुळे मी नियमित, तेही व्हाइट अशी गुंतवणूक करीत गेलो, ज्याचे सुमधुर फळ मला चाखायला मिळाले. पुढल्या पिढीने ते टिकवून ठेवले तर त्यांनाही ही सुमधुर फळे नक्की चाखायला मिळणार आहेत.”
“१९८० ते आजपर्यंत आर्थिकदृष्ट्या माझ्या आयुष्यातला अत्यंत कसोटीचा काळ फक्त १९८७ दरम्यान आला होता. माझी एकेठिकाणी आर्थिक गुंतवणूक अडचणीत आल्याने मी अक्षरश: रस्त्यावर आलो होतो. पुढली पत्रकारिता करण्यासाठी मग मला जळगाव सोडून नेसत्या कपड्यानिशी कायम मुंबईत यावे लागले. अगदी काही कुटुंब सदस्यांनी तर मला त्यांच्याकडे कुठल्याशा सणानिमित्त गेल्यानंतर घराबाहेर काढले होते. पण, हार मानणे माझ्या स्वभावात नव्हते. पुढल्या वर्षभरात गेलेले पैसे मिळाले. वैभव महालक्ष्मी व गणपतीच्या आशीर्वादाने पुन्हा प्राप्त झाले. अमुक एखाद्याने आपल्याला संकटात मदत केली तर त्याची आयुष्यभर जाणीव ठेवायची, माझा तो स्वभाव आहे. १९८७ मध्ये जेव्हा मुंबईत आलो तेव्हा त्यावेळेचे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकरचे आमदार सुबोध सावजी यांनी मला त्यांच्या आमदार निवासाच्या खोलीत आश्रय तर दिलाच पण मुंबईतील पहिले पाक्षिकदेखील मी त्यांच्याच निवासी खोलीतून काढले होते. पुढे सुबोध सावजी राज्यमंत्री झाले आणि त्यांचे लक्ष नको त्याठिकाणी नको त्याबाबतीत अडकले, म्हणून त्यांच्यावर एकदा हलकीशी टीका केली जी त्यांना खूप झोंबली असावी.”
“एक दिवस मी आणि माझे धाकटे बंधू अगदी सहज त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला अतिशय खालच्या पातळीवर येऊन झाप झाप झापले. मी त्यांना एवढेच म्हणालो, तुम्हाला राजकारणात टिकायचे असेल तर या पद्धतीने तुम्ही वागता कामा नये, त्यांनी माझे सांगणे निगेटिव्ह पद्धतीने घेतले. पुढे माझे म्हणणेच खरे ठरले. जंग जंग पछाडूनदेखील १९९५नंतर सुबोध सावजी ना मंत्री झाले ना आमदार म्हणून कधी निवडून आले. ते त्यादिवशी अद्वातद्वा बोललेत खरे पण मी मनात राग ठेवला नाही. कारण मला कधी राग येतच नाही. फार कमी वेळा माझा बोलण्यातून तोल जातो. लिखाणासारखे दुधारी शस्त्र हाती असताना आपण कशाला तोंडाची वाफ गमवायची?”
“मला वाटते.. असे माझ्याबाबतीत अनेकदा घडते की अमुक एखाद्या नेत्याला, मंत्र्याला, अधिकाऱ्याला, पत्रकाराला अत्यंत महत्त्वाचे म्हणजे कुटुंब सदस्यांना, नातेवाईकांना काही चांगले सांगायला जावे, तर ते त्यातून वेगळे वाईट अर्थ काढून मोकळे होतात. पुढे नुकसान त्यांचेच होते. अगदी मुलांनादेखील अमुक करू नका सांगतो ते ऐकतीलच असे नसते. पुढे त्यांना फटका बसला की मग ते आपणहून सांगायला येतात की तुमचे त्यावेळी ऐकायला हवे होते. वयाच्या थेट १६व्या वर्षी मी घरातून, गावातून, कुटुंबातून बाहेर पडलो आणि मजल दरमजल मारत येथपर्यंत पोहोचलो. दररोज आजतागायत जगातले बरेवाईट अनुभव घेत आल्याने त्यावर विचारमंथन करीत पुढेपुढे सरकल्याने समाजातले, आयुष्यातले नेमके कळते त्याचा आधार घेत, कधी प्रत्यक्ष भेटून एखाद्याला समजावून सांगतो तर कधी लिखाणातून अमुक एखाद्याची चूक, मग तो कितीही ताकदवान असला तरी लिहून मोकळा होतो.”
“आपली आर्थिक स्थिती, आपली वृत्ती, आपले पाप, आपले शिक्षण, घरातले वातावरण, व्यसने हे सारे बहुतेक भारतीय लपवून ठेवतात. एक ना एक दिवस ते नक्की बाहेर पडते. त्यातून मोठे नुकसान होते. मी मराठी माध्यमातून सेकंड क्लासमध्ये पास झालो हे सांगण्यात मला कधीही लाज वाटली नाही. सुब्रमण्यम स्वामी, सोनिया गांधी यांच्याबाबतीत थेट पुरावे सादर करून नेमके तेच म्हणाले होते की ही बाई फक्त पाचवा वर्ग पास असताना का म्हणून सांगते की तिने केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे, मुखवटा व नेमका चेहरा यात तफावत ठेवल्यानेच आयुष्याच्या संध्याकाळी शरद पवारांना हे असे लाजिरवाणे राजकीय आयुष्य काढावे लागत आहे. राजकारणात हारजीत नक्की होत असते पण पवारांची हार त्यापद्धतीची नाही. त्याला भीषण वास्तवाच्या राजकीय कंगोऱ्यांनी वेढलेले आहे जे अत्यंत वाईट आहे. ज्यांना पवारांनी सर्वच क्षेत्रात केवळ पाप मार्गाने मोठे केले ते सारे त्यांना सोडून गेले किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे खादाड बिळात जाऊन लपले आहेत. हे घडायला नको होते. पण पवारांनी चांगल्या मित्रांचे कधी ऐकलेच नाही. दुर्दैवाने.. “

