Sunday, September 8, 2024
HomeArchiveइक्विटी की सोने:...

इक्विटी की सोने: सुरक्षित मार्ग कोणता?

Details

 
 
“अनुज गुप्ता
 
सहायक उपाध्यक्ष (वस्तू आणि चलन संशोधन), एंजल ब्रोकिंग
 
hegdekiran17@gmail.com
 
सध्या कोरोनाची साथ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे बाजारातील अस्थिरतेच्या काळात गुंतवणुकीचे पर्याय कमी होत असल्याने गुंतवणुकदार चिंतेत आहेत. भारतात मालमत्ता म्हणून सोन्याला एक वेगळीच मान्यता आहे. मात्र आधुनिक काळातील बाजारातील गतिशीलतेमुळे हे समीकरण गुंतागुंतीचे झाले. कारण यात अनेक घटकांचा समावेश होतो.
 
सुरक्षित पर्यायांबाबतचा हा बारमाही प्रश्न पुन्हा एकदा इक्विटी मार्केट आणि सोन्यामधील तुलना करतो. दोन्ही बाजारांचे १० वर्षांहून अधिक काळ निरीक्षण केल्यास आपल्याला सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात चांगला पर्याय निवडण्यासाठी अंतर्दृष्टी मिळू शकते.
 
मागील दशक: इक्विटी आणि गोल्ड मार्केटमधील ट्रेंड
 
मागील १० वर्षांमध्ये सेन्सेक्सने (बीएसई३०) आणि बीएसई ५००ने यासारख्या भारतीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ९.०५% आणि ८.५% सीएजीआर नोंदवला गेला. तथापि, २०१२मधील अर्थिक मंदीमुळे २०१० ते २०१५ या कालावधीत हळूहळू वाढ झाली. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ ते जानेवारी २०१६पर्यंतही वाढ झाली. सेन्सेक्सेची वृद्धी डिसेंबर २०१७मध्ये जवळपास १७,५०० अंकांवरून ४०,००० अंकांवर पोहोचली. डिसेंबर १९पासून जागतिक ट्रेंडमध्ये काही काळ विश्रांती असूनही हा काळ विविध क्षेत्रांमधून इक्विटीद्वारे संपत्ती निर्माण करण्याचा काळ ठरला.
 
कोव्हिड-१९च्या प्रसारामुळे सर्व आर्थिक कामकाज ठप्प झाले आणि संपत्ती निर्मितीची शक्यताही कमी झाली. त्यामुळे जागतिक बाजारपेठ कोसळली. परिणामी एप्रिल २०२०च्या सुरूवातीस भारतीय बाजारपेठेत २३ टक्के म्हणजेच २७,४०० अंकांची घसरण झाली. जास्तीतजास्त घसरण सुमारे ४० टक्के होती. एप्रिलपासून झालेली सुधारणा महत्त्वाची असली तरी बाजारपेठेत वाढती अनिश्चितता आणि नव्या ट्रेंड्समुळे गुंतवणुकदारांचे रिझर्वेशन ही वैशिष्ट्ये दिसून आली. तर दुसरीकडे, सोन्याच्या बाजारातही हंगामी वाढ दिसून आली. लोक, विशेष संकटांची चाहूल लागते तेव्हा पोर्टफओलिओमध्ये वैविध्य आणण्याकरिता सोन्याचा वापर करतात. २००८मध्ये सोन्यात ८,००० ते २५,००० पर्यंत वाढ झाली. तर २०१६नंतर सोन्याच्या दरांनी प्रति १० ग्राममागे ३१,००० रूपयांची पातळी पार केली. भारतातील आर्थिक वृद्धीतील मंदीमुळे मागील एकाच वर्षात हे दर वाढले. सोन्याच्या दरांनी ३५,००० वरून आज ५०,९०० रूपयांवर मजल मारली आहे.
 

 
 
एप्रिल महिन्यात सोन्यातील गुंतवणुकीकून ११ टक्के परतावा मिळाला. त्यानंतरच्या महिन्यांमध्ये बहुपटीने परतावा वाढला. गोंधळाच्या स्थितीत सोने आणि संबंधित मालमत्तेचे पर्याय बऱ्याच काळापासून सुरक्षित पर्याय मानले गेले. सध्याचे संकटही याच प्रकारातले आहे. वाढत्या कोव्हिड-१९ रूग्णांमुळे जागतिक वाढीतही अडथळे निर्माण झाले. कित्येक जागतिक वित्तीय संस्था आणि सल्लागार कंपन्या इक्विटी मार्केटच्या घसरणीचा अंदाज व्यक्त करतात.
 
प्रभावी घटक आणि गुंतवणुकीचे पर्याय
 
२००८मध्ये प्रमुख बँक आणि जागतिक बाजारपेठा कोसळत असताना अमेरिकी फेड आणि इतर केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रोत्साहन पॅकेजद्वारे जागतिक वित्तीय प्रणालीत सुधारणेचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या काही वर्षांत अनेक बाजारपेठांवर परिणाम होतच राहिला. यामुळे ग्रीससारखे लहान युरोपियन देश कर्जबाजारी झाले आणि युरोपियन मध्यवर्ती बँकेला युरोपिय युनियनच्या सिंगल मार्केटमध्ये ऊर्जा भरावी लागली. साथीनंतरच्या उपायांमध्ये, जागतिक बँका आणि भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करण्यास उत्सुक आहेत.
 
व्याजदर आणि सोन्याच्या किंमतीचा नकारात्मक परस्परसंबंध असल्याने वर उल्लेख केलेल्या आर्थिक घसरणीमुळे इक्विटी बाजारावर तीव्र परिणाम होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने जून २०२०मधील वृद्धी अंदाजात म्हटले की, जागतिक विकास एप्रिलमधील अंदाजापेक्षा १.९ टक्के कमी म्हणजेच ४.९ टक्क्यांच्या जवळपास राहील. तसेच एप्रिल २०२०मधील वर्ल्ड इकोनॉमिक आउटलुक रिपोर्टने ३ टक्के घटीचा अंदाज वर्तवला.
 

 
 
२००८मधील आर्थिक मंदीपेक्षा हा वाईट होता. याच धर्तीवर सल्लागार फर्म डेलॉइटने प्रमुख तांत्रिक अडथळे दर्शवले. कामाचे स्वरूप बदलल्याने बाजारपेठ आणि बँकेवर गंभीर परिणाम झाला. या अहवालात बाँड उत्पादनातील घसरण, क्रूड किंमती आणि व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यताही नमूद केली आहे. हे घटक तरलतेच्या शीर्षावर असल्याने बाजारपेठेला नुकसानकारक ठरतात. यात आणखी भर पडल्यास, कोव्हिड-१९मुळे बँकिंग संस्था आणि शॉर्ट टर्म वित्तीय जोखीम तसेच रेग्युलेटरी कम्प्लायन्सप्रकरणी बाजाराला इशाराही देण्यात आला आहे. कोव्हिड-१९च्या दीर्घकालीन जोखीमीचे अनपेक्षितरित्या आकलन होऊ शकत नाही. या संकटाचा निष्कर्ष अजूनही दृष्टीपथात नाही.
 
भारत सरकारने नुकतीच अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी २० लाख कोटी रूपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली आहे. यामुळे वित्तीय बाजार आणि बाँड अॅसेट वर्गाला नुकसान होईल. जास्त लिक्विडीटी आणि मर्यादित कामकाज अशा अनिश्चित भवितव्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीचा ट्रेंड सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोन्यातील अनेक गुंतवणुकीच्या शक्यतांवर लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून महागाईच्या ट्रेंडचा प्रतिकार होऊ शकेल.
 
कोव्हिडच्या काळात सोन्याची भौतिक मालमत्ता जमा करणे कठीण होत आहे. त्यामुळे सोनेसमर्थित पर्याय उदा. गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ईटीएफ) हा एक आशादायी पर्याय आहे. भारतात सोन्याच्या सकारात्मक प्रवाहाने मागील वर्षी दर महिन्याला ३५ टनांची सरासरी मागे सारली आहे. यावर्षी मार्च २०२०पासून हा दर ३३९.९ टन एवढा झाला आहे. जागतिक स्तरावर, केंद्रीय बँकांनी विलंबाने सोन्याची विक्रमी पातळी खरेदी केली आहे. त्यामुळे बाजारपेठेच्या विकासासाठी ही डोकेदुखी ठरू शकते. याचा इक्विटीवर परिणाम होईल आणि बाजारातील अस्थिरता वाढेल. त्यामुळे सध्या तरी सोने आणि सोने आधारीत साधने हाच उत्कृष्ट पर्याय आहे.
 “

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content