Homeडेली पल्सपुण्याच्या एआयएसएसएमएस अभियांत्रिकी...

पुण्याच्या एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात पासपोर्ट शिबीर

पुण्याच्या प्रादेशिक पारपत्र कार्यालयाकडून येत्या 15 ते 17 एप्रिलदरम्यान पुण्याच्याच एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात पासपोर्ट (पारपत्र) सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पारपत्रासाठी नियोजित वेळेची सोय लवकर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पारपत्र वितरणसेवा सर्वदूर सहज देता यावी या उद्देशाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

कागदपत्रे: अर्ज ऑनलाइन सादर करण्यापूर्वी, प्रौढ आणि अल्पवयीन अशा दोन्ही अर्जदारांसाठी दिलेल्या तपाससूची (checklists) काळजीपूर्वक वाचावी. अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी, पारपत्र प्राधिकरणाला अर्ज  निकाली काढण्यासाठी आवश्यक वाटल्यास सर्व प्रकारची चौकशी करण्याचा तसेच अर्जदाराकडून अतिरिक्त माहिती आणि कागदपत्रे मागवण्याचा अधिकार आहे. 

अशी बुक करा मोबाइल व्हॅनसाठी अपॉइंटमेंट:

i) (https://www.passportindia.gov.in) या पासपोर्ट इंडियाच्या संकेतस्थळाला भेट द्या आणि ‘NORMAL’ योजनेअंतर्गत अर्ज सादर करा.

ii) ऑनलाइन पेमेंट पूर्ण केल्यानंतर शेड्यूल अपॉइंटमेंट पेजवर जा, लोकेशनमध्ये मोबाइल व्हॅन हा पर्याय निवडा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा.

पासपोर्ट मोबाईल सेवा केंद्राचा तपशील:

i) दिनांक: 15, 16 आणि 17 एप्रिल

ii) स्थळ: ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (एआयएसएसएमएस), 1, केनेडी रोड, आरटीओ कार्यालयाजवळ, रेल्वे ऑफिसर्स कॉलनी, पुणे 411001.

iii) वेळ: सकाळी 08:30 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत (अर्जदारांनी, ऑनलाइन अर्जाच्या पावतीवर नमूद केलेल्या नियोजित भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी उपस्थित राहवे.)

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content