Homeएनसर्कल'जेईई ॲडव्हान्स्ड' परीक्षा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘जेईई ॲडव्हान्स्ड २०२६’ ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदाच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांवर आधारित बहुपर्यायी आणि संख्यात्मक प्रश्न विचारले जातील, जे विद्यार्थ्यांच्या वैचारिक आकलनाची आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेची चाचणी घेतील.

दोन अनिवार्य पेपर

ही परीक्षा संगणक आधारित (सीबीटी) असेल. परीक्षेत दोन अनिवार्य पेपर असतील:

  • पेपर १: सकाळी ९:०० ते दुपारी १२:००
  • पेपर २: दुपारी २:३० ते ५:३०
    विद्यार्थ्यांना दोन्ही पेपर्सला उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

नोंदणी प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
जेईई मेन २०२६मध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळ https://jeeadv.ac.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

  • ऑनलाइन नोंदणी सुरू: २३ एप्रिल २०२६ (सकाळी १०:०० वाजेपासून)
  • नोंदणीची अंतिम तारीख: २ मे २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत)
  • शुल्क भरण्याची अंतिम तारीख: ४ मे २०२६
  • प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) उपलब्ध: ११ मे ते १७ मे २०२६
  • निकाल घोषणा: १ जून २०२६ (अंदाजे)

पात्रता निकष

या परीक्षेसाठी जेईई मेन २०२६च्या निकालात पहिल्या अडीच लाख क्रमांकांत स्थान मिळवणारे विद्यार्थी पात्र ठरतील. यामध्ये विविध प्रवर्गांनुसार आरक्षणाचे नियम लागू असतील. तसेच, उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर २००१ रोजी किंवा त्यानंतरचा असावा. एससी, एसटी आणि पीडब्ल्युडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

अर्जासाठी लागणारे शुल्क

  • महिला उमेदवार व मागासवर्ग प्रवर्ग: ₹ १,६००/-
  • इतर सर्व उमेदवार: ₹ ३,२२०/-

विद्यार्थ्यांसाठी सूचना

आयआयटी, रुरकीने स्पष्ट केले आहे की, परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आणि माहितीपुस्तिका अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ https://jeeadv.ac.in या पोर्टलवरील माहितीचा आधार घ्यावा.

जेईई मेन सत्र-2 ला आजपासून प्रारंभ

दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)द्वारे आयोजित ‘जेईई मेन 2026’च्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेला आज, गुरुवारी सकाळी 9 वाजेपासून सुरुवात झाली. देशभरातील आणि परदेशातील निवडक शहरांमध्ये ही परीक्षा संगणक आधारित (सीबीटी) पद्धतीने घेतली जात आहे. पहिल्या सत्रात कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही ‘दुसरी संधी’ असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि भवितव्याचा तणाव अशा संमिश्र भावना दिसत आहेत. या परीक्षेसाठी ड्रेस कोडचे पालन आवश्यक असून परीक्षा केंद्रात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

आज पहिल्या दिवशी अभियांत्रिकी (बीई/बी टेक) प्रवेशासाठीचा पेपर होत आहे. परीक्षा केंद्रांवर सकाळी 7:30 वाजेपासूनच विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. बायोमेट्रिक हजेरी आणि मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. आजचे पहिले सत्र दुपारी 12 वाजेपर्यंत चालणार असून, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्राथमिक प्रतिक्रिया समोर येतील. 8 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेतून देशातील नामांकित एनआयटी आणि आयआयआयटी संस्थांमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Continue reading

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...

झाडाला पिकलाय आंबा.. गाण्याची दुबईत क्रेझ!

दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून...

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...
Skip to content