Homeन्यूज ॲट अ ग्लांसतत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

तत्काळ योजनेसाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असून, पात्रता मार्गदर्शक तत्त्वे कठोर आहेत. अनेक अर्जदार यापैकी एक अथवा दोन्ही निकष पूर्ण करू शकत नाहीत, यशस्वीपणे अर्ज सादर करू शकत नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी याबाबतची नियमावली आणि सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि अपॉइंटमेंच्या दिवशी आपल्याकडे पुरेशी आणि पात्रतेचे निकष पूर्ण करणारी वैध कागदपत्रे आहेत का, याची खात्री करावी. तत्काळसाठी अपात्र ठरण्याचे निकष जाणून घेण्यासाठी या लिंकवर जावे: https://www.passportindia.gov.in/psp/TatkaalPassports (अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी पासपोर्ट कायद्यानुसार पासपोर्ट प्राधिकरण अशी सर्व चौकशी करू शकते आणि अर्जावर पुढची कार्यवाही करण्यासाठी आवश्यक वाटणारी अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करायला सांगू शकते.)

तत्काळ विशेष मोहिमेत अपॉइंटमेंटसाठी अशी करा नोंदणी:

  1. पासपोर्ट इंडिया वेबसाइट (https://www.passportindia.gov.in) किंवा mPassport सेवा एपला भेट द्या आणि TATKAAL योजनेअंतर्गत अर्ज दाखल करा.
  2. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर, ‘शेड्यूल अपॉइंटमेंट पेज’वर जा, ‘PSK पुणे’ हे स्थान निवडा आणि विशिष्ट तारखेसाठी अपॉइंटमेंट बुक करा.

टीप: ही मोहीम फक्त तत्काळ अपॉइंटमेंटसाठी आहे. सामान्य श्रेणीतील व्यक्तींचे अर्ज किंवा आयत्यावेळी येणाऱ्या व्यक्तींना यात परवानगी दिली जाणार नाही.

विशेष मोहिमेचा तपशील:

  1. तारीख: 7 फेब्रुवारी 2026 (शनिवार)
  2. स्थळ: झिरो वन, क्र.79/1, घोरपडी, मुंढवा रोड, पिंगळे वस्तीसमोर, गंगा ऑर्किड, मुंढवा, पुणे– 411036.
  3. श्रेणी: केवळ तत्काळ नियुक्त्या (नवीन आणि पुनर्निर्देशित)
  4. वेळ: सकाळी 09:00 ते संध्याकाळी 05:00 (अर्जदारांनी त्यांच्या नियोजित अपॉइंटमेंटच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी कार्यालयात पोहोचावे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...

महाराष्ट्राची तनु भान ठरली देशातली ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’

प्रजासत्ताकदिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीत महाराष्ट्राची कन्या तनु भान हिने आपल्या अद्वितीय कर्तृत्त्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनुने आर्मी विंगमधून (सीनियर विंग) देशात 'सर्वोत्कृष्ट कॅडेट' हा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला आहे. पंतप्रधान...
Skip to content