Homeकल्चर +सीबीडीत रंगला शालेय...

सीबीडीत रंगला शालेय विद्यार्थ्यांच्या कलेचा आविष्कार

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला – क्रीडा महोत्सव 2026’अंतर्गत सीबीडी बेलापूर येथील सुनील गावस्कर मैदानावर शालेय समूहनृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमास आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. सदर स्पर्धेत नवी मुंबईतील विविध शाळा तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्य, पारंपरिक लोकनृत्य तसेच बहारदार कोळीगीतांवरील सादरीकरणांनी या विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

मुलांमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आमदार म्हात्रे यांनी विशेष कौतुक केले. शालेय समूहनृत्य स्पर्धेत प्राथमिक विद्या मंदिर, बेलापूर यांनी प्रथम पारितोषिक पटकावला. पीपल्स एज्युकेशन इंग्रजी माध्यम शाळा, सीबीडी बेलापूर यांनी द्वितीय पारितोषिक, तर पी. एस. सेंटर स्कूल यांनी तृतीय पारितोषिक मिळवले. गौरव स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. विजेत्या व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, हा महोत्सव येत्या २५ तारखेपर्यंत सुनील गावस्कर मैदान येथे सुरू राहणार आहे. या कालावधीत नागरिकांसाठी विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध असणार आहे. सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content