Homeकल्चर +कतरिना आणि हृतिकचं...

कतरिना आणि हृतिकचं परस्परविरोधी जग आलं सोबत!

आपल्या नवीन अभियानासाठी राडोने कतरिना कैफ आणि हृतिक रोशन या आपल्या दोन प्रसिद्ध जागतिक अम्बॅसडर्सना एका दृश्यात्मक क्रिएशनमध्ये एकत्र आणले आहे, ज्यात प्रत्येक बाबतीत परस्परविरोधी असलेली दोन जगं एकमेकांकडे आकृष्ट होतात व शेवटी एकत्र होतात. या दोन्ही कलाकारांशी केलेल्या राडोच्या पहिल्या भागीदारीच्या यशानंतर, आता या स्विस घडयाळ निर्मात्या कंपनीने एक नवीन दमदार नॅरेटीव्ह सुरू केले आहे. दोन वेगळ्या वाटा, दोन विरोधी ऊर्जा आणि त्यांना एकत्र बांधणारी एक अद्वितीय आणि अनिवार्य शक्ती: राडो अँकर, प्रतीक सातत्याचे, नेमकेपणाचे आणि जोडणीचे.

या अभियानात कतरिना आणि हृतिकच्या वैयक्तिक विश्वांचा शोध घेतला आहे, ज्याची जडणघडण त्यांच्या संवेदनशीलतेमधून आणि कलात्मक परिचयातून झाली आहे. कतरिना एका कर्व्ह्ज आणि प्रकाशाने नटलेल्या वास्तुशिल्पीय परिसरात दिसते: पांढऱ्या आणि फिकट तपकिरी रंगाच्या पडद्यांनी वेढलेल्या एका भुलभुलैयामध्ये. ही अधांतरी असलेली जागा हा पावित्र्य, शालीनता आणि हलकेफुलके असण्याचे प्रतीक आहे, ज्यामधून तिचे वेगळेपण उठून दिसते. तिच्या मनगटावर चमकणाऱ्या सेंट्रिक्स डायमंड्समधून या अभिनेत्रीचा सुसंस्कृतपणा आणि तिच्या निर्दोष परिसराचे मार्दव दिसते. याच्याविरुद्ध, हृतिक एका रासवट, नैसर्गिक आणि तीव्र सेटिंगमध्ये दिसतो. काळाच्या ओघात बनलेल्या ज्वालामुखीय खडकांच्या रचना त्याला वेढतात आणि त्याच्या प्रवासाची ओळख सांगणारी गहनता, शक्ती आणि अन्वेषणाची भावना प्रतिबिंबित करतात. त्याने कॅप्टन कुक हाय-टेक सिरॅमिक क्रोनोग्राफ आपल्या मनगटावर बांधले आहे. साहसांसाठी बनवलेल्या या घडाळ्यातील ठळक रेषांमधून ऊर्जा आणि दमदार व्यक्तिमत्वाची झलक दिसते.

सुरुवातीला आपल्याला वाटते की, ही दोन्ही जगं समांतर चालली आहेत, जी कधीच एक होणार नाहीत. पण एक अबोध बळ त्यांना एकमेकांकडे खेचून आणते. हे बळ आहे राडो अँकर- ते केवळ एक प्रतीक नाही, तर स्वाक्षरी आहे! आज राडोच्या सगळ्या ऑटोमॅटिक घड्याळांवर असलेले अँकर हे अचूकता, विश्वासार्हता आणि सातत्याचे प्रतीक आहे. तो एक संतुलनाचा अढळ बिंदू आहे, जो कालातीत असून जगांना जोडणारा आहे. या अभियानात, तो केंद्रीय घटक आहे. एक मॅग्नेटिक हृदय, जे कतरिना आणि हृतिकला एका नवीन जगाकडे घेऊन जातो: असे एक स्थान जेथे फरक संपून जातात, ऊर्जा एकमेकांना पूरक होते आणि दोन्ही मार्ग एकत्र होतात. ही भेट केवळ कतरिना आणि हृतिक यांची भौतिकदृष्ट्या झालेली भेट नाही, तर मूव्हमेंट, कनेक्शन आणि राडोच्या कालातीत सुसंस्कृतपणातून आकार घेतलेल्या एका सुसंवादी नवीन वातावरणाच्या निर्मितीचे ते प्रतीक आहे.

या नवीन अभियानाच्या माध्यमातून राडो आपले तत्वज्ञान व्यक्त करते. प्रत्येक घड्याळ म्हणजे शोध घेण्याचे, अनुभव घेण्याचे आणि नाती जोडण्याचे एक निमंत्रण आहे. हळुवार किंवा सशक्त, हलक्याफुलक्या किंवा दणकट, नाजूक किंवा धाडसी क्षणांत राडोची घड्याळे व्यक्तीला त्यांच्या-त्यांच्या प्रवासात साथ देतात आणि कोणती गोष्ट त्यांना एकत्र आणते हे दाखवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...

रतन टाटांची जयंती उत्साहात साजरी

रतन टाटांची जयंती केवळ स्मरणदिन न राहता महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी व्हावी, अशी मागणी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार के. रवि (दादा) यांनी केली. देशाच्या औद्योगिक व सामाजिक प्रगतीत रतन टाटा यांचे अतुलनीय योगदान पाहता यंदा 28...

‘उदय’ शुभंकर झाला ‘आधार’चा चेहरा!

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) 'आधार' शुभंकराचे नुकतेच अनावरण केले. लोकांना आधार सेवांचे चांगल्या पद्धतीने आकलन व्हावे यासाठी हे एक नवीन 'रेसिडेंट फेसिंग' संवाद माध्यम असेल. 'उदय' (Udai) नावाचा हा आधार शुभंकर आधारशी संबंधित माहिती अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल.आधार...
Skip to content