महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर करण्यात आले आहे. युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे माजी खेळाडू जनार्दन कोळी हे ठाण्यातील पहिले राष्ट्रीय खो-खोपटू होते. विजयवाडा येथील राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी बजावली होती. त्यांची तीन वेळा राज्य संघात निवड होऊन त्यांनी ठाण्याचे नाव उंचावले होते.
या विभागीय स्पर्धेसाठी पुरुष व महिलांच्या प्रत्येकी १६ प्रतिष्ठित संघांना सहभागाची परवानगी देण्यात आल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांनी सांगितले. स्पर्धेचे निरीक्षक म्हणुन राज्य खो-खो असोसिएशनतर्फे (बाळ) तोरसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष दत्तात्रय ठाणेकर आणि हेमंत कोळी यांनी दिली. या स्पर्धेत ठाणे, मुंबई शहर व मुंबई उपनगरातील दमदार आणि परंपरागत ताकदवान संघांची रंगतदार लढत होणार आहे.
स्पर्धेत सहभागी पुरुष संघ:
विहंग क्रीडा मंडळ (ऐरोली), ग्रिफीन जिमखाना (कोपरखैरणे), ज्ञानविकास फाउंडेशन (कोपरखैरणे), युवक क्रीडा मंडळ (कल्याण), धी युनायटेड स्पोर्ट्स क्लब (ठाणे), आनंदभारती समाज (ठाणे), मावळी मंडळ (ठाणे), शिवभक्त क्रीडा मंडळ (बदलापूर), राज क्रीडा मंडळ (बदलापूर), शिर्सेकर्स महात्मा गांधी (मुंबई उपनगर), सह्याद्री संघ (मुंबई उपनगर), प्रबोधन क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), श्री समर्थ व्यायाममंदिर (मुंबई), विद्यार्थी क्रीडा केंद्र (मुंबई), सरस्वती स्पोर्ट्स क्लब (मुंबई), ओम समर्थ व्यायाममंदिर (मुंबई).
स्पर्धेत सहभागी महिला संघ:
ज्ञानविकास फाउंडेशन (कोपरखैरणे), रा. फ. नाईक महिला संघ (कोपरखैरणे), शिवभक्त क्रीडा मंडळ (बदलापूर), धी युनायटेड स्पोर्ट्स क्लब (ठाणे), शाहू स्पोर्ट्स क्लब (रबाळे), आनंदभारती समाज (ठाणे), मावळी मंडळ (ठाणे), राज क्रीडा मंडळ (बदलापूर), न्यू बॉम्बे सेंटर स्पोर्ट्स अकॅडमी (घणसोली), शिर्सेकर्स महात्मा गांधी (मुंबई उपनगर), सह्याद्री संघ (मुंबई उपनगर), शिवनेरी (मुंबई), श्री समर्थ व्यायाममंदिर (मुंबई), अमरहिंद (मुंबई), सरस्वती स्पोर्ट्स क्लब (मुंबई), वैभव क्रीडा मंडळ (मुंबई).
ठाण्यातील खो-खोप्रेमींसाठी ही तीन दिवसीय स्पर्धा एक पर्वणी ठरणार असून, कौशल्य, वेग, चातुर्य आणि संघभावनेच्या दुर्मिळ खेळाचे दिमाखदार दर्शन घडणार आहे.

