गोव्यात काल भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सुरूवात एका बंदिस्त सभागारात न होता चक्क रस्त्यांवर झाली. रस्त्यांवर उतरा. लय अनुभवा. कथा उलगडताना पाहा, अशा जिवंत, उत्साहपूर्ण वातावरणात या महोत्सवाला प्रारंभ झाला. आतापर्यंतच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रवासात प्रथमच, ‘इफ्फी’ने पारंपरिक चार भिंती ओलांडून गोव्याच्या चैतन्यशील हृदयात पाऊल ठेवले. पणजी शहराला एका विशाल, जिवंत कॅनव्हासमध्ये रूपांतरित केले. सिनेमाची भव्यता सांस्कृतिक वैभवात मिसळून गेली आणि कथाकथनाची अमर जादू गोव्याच्या रस्त्यांवर उतरली. इफ्फीच्या वारशातील एका धाडसी नवीन अध्यायाची ती पहाट होती. गॅब्रिएल मस्कारोची डिस्टोपियन कथा ‘द ब्लू ट्रेल’, या चित्रपटाने या 56व्या इफ्फीचे उद्घाटन झाले. यानिमित्ताने झालेल्या परेडमध्ये गोवा सरकारच्या 12 चित्ररथांसह दोन डझनहून अधिक चित्ररथांनी भारताचा सिनेमॅटिक वारसा, अॅनिमेशनचे जग आणि प्रादेशिक संस्कृतींच्या समृद्ध विविधतेचे दर्शन घडवले. वेव्हज फिल्म बाजारच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात कोरिया प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय सभेच्या सदस्य जेवॉन किम यांनी वंदे मातरमचे भावपूर्ण सादरीकरण केले आणि उपस्थित प्रेक्षकांना एका अनपेक्षित आणि अंतःकरणाला भिडणाऱ्या क्षणाचा अनुभव घेता आला.

या समारंभाचे उद्घाटन करताना गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी इफ्फीच्या वाढत्या जागतिक दर्जाचे कौतुक केले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्थळ म्हणून गोव्याच्या उदयावर प्रकाश टाकला. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनीही उपस्थितांना संबोधित केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते नंदमुरी बालकृष्ण यांचा चित्रपटसृष्टीतील त्यांच्या 50 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीसाठी, तसेच त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीला समृद्ध करण्यात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी सत्कार करण्यात आला.

चित्ररथांची परेड
यानिमित्ताने झालेल्या परेडमध्ये गोवा सरकारच्या 12 चित्ररथांसह दोन डझनहून अधिक चित्ररथांनी भारताचा सिनेमॅटिक वारसा, अॅनिमेशनचे जग आणि प्रादेशिक संस्कृतीचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे चित्ररथाच्या माध्यमातून सादर केलेला ‘भारत एक सूर’ हा भव्य लोककला कार्यक्रम. यात 100हून अधिक कलाकारांनी पारंपरिक नृत्य सादर केले आणि या सादरीकरणाच्या भव्यतेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. छोटा भीम, मोटू पतलू आणि बिट्टू बहानेबाजसारख्या लाडक्या अॅनिमेटेड पात्रांच्या उपस्थितीने उत्साहात भर पडली. त्यांनी साधलेल्या थेट संवादांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढली. या संचलनाने महोत्सवाच्या पुढील दिवसांसाठी एक उत्साही आणि उत्सवी वातावरण निर्माण केले.
उद्घाटनाचा चित्रपट
गॅब्रिएल मस्कारोची डिस्टोपियन कथा ‘द ब्लू ट्रेल’, ज्याला मूळ पोर्तुगीजमध्ये ‘ओ उल्टिमो अझुल’ म्हणून ओळखले जाते, या चित्रपटाने 56व्या इफ्फीचे उद्घाटन झाले, जे गोव्याच्या किनारपट्टी क्षेत्रात त्याच्या प्रारंभाचे प्रतीक आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, चित्रपटातील कलाकार आणि क्रू, रेड कार्पेटवर उपस्थित होते. मारिया अलेजांड्रा रोजास, आर्टुरो सालाझार आरबी, क्लॅरिसा पिनहेरो, रोसा मालागुएटा आणि गॅब्रिएल मस्कारो यांचा त्यात समावेश होता.

एक डायस्टोपियन नाट्य:
ब्राझीलच्या डिस्टोपियनच्या भयावह पार्श्वभूमीवर, ‘द ब्लू ट्रेल’ ही तेरेसा नावाच्या 77 वर्षीय उत्साही महिलेची कथा आहे जी नशिबाचा कठोर फेरा आणि तिला एका वृद्धाश्रमात बंदिस्त करण्याच्या सरकारच्या दबावाला आव्हान देते. स्वप्नांनी भरलेले हृदय आणि असीम भावना घेऊन, ती पहिल्यांदाच आकाशाचा अनुभव घेण्याची आणि भरारी घेण्याची आकांक्षा बाळगून अॅमेझॉनमधून एका धाडसी प्रवासाला निघते. सामान्य मार्गांनी प्रवेश नाकारला गेल्याने, ती बोटीने निघते. वाटेत तिला जिवंत पात्रे भेटतात. तिच्या धैर्याची आणि आश्चर्याची परीक्षा घेणाऱ्या अनेक आव्हानांना ती तोंड देते. प्रत्येक वळण, अडखळणं आणि जादूच्या क्षणभंगुर क्षणांमधून, तेरेसाचा प्रवास स्वातंत्र्य, लवचिकता आणि समाजाने वयासाठी ठरवलेल्या सीमांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अटींवर जीवन जगण्याच्या अदम्य आनंदाचा दाखला बनतो, असे या चित्रपटाचे सार आहे.
वेव्हज फिल्म बाजारचे उद्घाटन
या बाजारात सातहून अधिक देशांमधील 300 चित्रपट प्रकल्प आणि प्रतिनिधीमंडळे एकत्र येत आहेत. याच कार्यक्रमात जेवॉन किमद्वारा वंदे मातरम सादरीकरणात कोरिया आणि भारताच्या मधुर संगीताचा मिलाफ करण्यात आला. जेवॉन किम यांनी केलेल्या वंदे मातरमच्या भावपूर्ण सादरीकरणाला गोव्याने दाद दिली. भारत वंदे मातरम.. या राष्ट्रीय गीताचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना ही मनमोहक प्रस्तुती सादर झाली. किम यांनी सादर केलेल्या या सादरीकरणाने या महोत्सवाला एक विशेष अर्थ मिळाला. भारताच्या सांस्कृतिक वारशाला समर्पित सादरीकरणानंतर सभागृहातील प्रेक्षकांनी त्यांना उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
दक्षिण आशियाची जागतिक चित्रपट बाजारपेठ असलेल्या वेव्हज फिल्म बाजारचा पणजी येथील मॅरियट रिसॉर्ट येथे एका प्रेरणादायी उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. यात नेते, धोरणकर्ते, चित्रपट निर्माते आणि जागतिक प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत आयोजित केल्या जाणाऱ्या या बाजाराचे यंदाचे 19वे वर्ष असून आता तो वेव्हज फिल्म बाजार म्हणून ओळखला जातो. हा बाजार 20 ते 24 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

