Homeन्यूज ॲट अ ग्लांसदिवाळीत प्रियजनांना भेट...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत आणि अखंड प्रवासाचा उत्तम अनुभव देतो. प्रवासाची उत्तम सोय आणि आराम  देणारा, FASTag (फास्टॅग)चा वार्षिक पास या सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी एक परिपूर्ण भेट असू शकतो. देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रूतगती महामार्गांवर वर्षभर त्रासमुक्त प्रवास करण्यास तो उपयोगी आहे. हा वार्षिक पास राजमार्गयात्रा ॲपद्वारे आपल्या प्रियजनांना भेट म्हणून दिला जाऊ शकतो.

फास्टॅग

ॲपवरील ‘पास द्या (ॲड पास)’ या पर्यायावर क्लिक करून, वापरकर्ता ज्या व्यक्तीला FASTag वार्षिक पास भेट देऊ इच्छितो; त्याचा वाहनक्रमांक आणि संपर्काचा तपशील जोडू शकतो. सोप्या OTP पडताळणीनंतर वार्षिक पास त्या वाहनाशी जोडलेल्या FASTagवर सक्रिय होईल. त्यामुळे तुमच्या प्रियजनांना त्याचा उपयोग होईल आणि प्रत्येक वापराच्या वेळी हेच प्रियजन तुमची नक्की आठवण काढतील. FASTag वार्षिक पास राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना एक अखंड आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय देतो. तो संपूर्ण भारतात सुमारे 1,150 टोल प्लाझांवर स्वीकारला जातो. वार्षिक पासच्या  एका वर्षाच्या वैधतेसाठी किंवा 200 टोल प्लाझा क्रॉसिंगसाठी 3000 रुपये शुल्क एकदाच भरल्यानंतर वारंवार FASTag पुनर्भरण (रिचार्ज) करण्याची आवश्यकता नाहीशी होते. हा पास वैध FASTag असलेल्या सर्व गैरव्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे. राजमार्गयात्रा अ‍ॅपद्वारे एकदाच  शुल्क भरल्यानंतर वाहनाशी जोडलेल्या विद्यमान FASTag वर वार्षिक पास दोन तासांच्या आत सक्रिय होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...
Skip to content