Homeचिट चॅटमलबार हिल बॅडमिंटनः...

मलबार हिल बॅडमिंटनः काव्या, अभिमन्यू, अनुश्री, विवान, रुद्रा, आदित्य, ओम विजेते

मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने मुंबईतल्या मलबार हिल क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या मुला-मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत काव्या कुमार, अभिमन्यू शेटे, अनुश्री मोडलींबकर, विवान वायंगणकर, रुद्रा गावडे, आदित्य पडवळ, ओम दाबेकर यांनी विजेते पदाचा मान मिळवला.

या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार येथील अकादमीचे सदस्य असलेले खेळाडू सहभागी झाले होते. अकादमीची ही ११७वी स्पर्धा होती. मलबार हिल क्लबचे सोहम दारुवाला, भैरव सेठ, बॉम्बे  जिमखान्याचे कुणाल राव यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. योनेक्स, मलबार हिल क्लबचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला मिळाले. अकादमीचे संचालक मनोहर गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेचा अंतिम निकालः

मुली:

११ वर्षांंखालील: काव्या कुमार वि. वि. आर्या जोशी, १३ वर्षांंखालील: अनुश्री मोडलींबकर वि. वि. तनया राणे, १५ वर्षांंखालील: रुद्रा गावडे वि. वि. सनया ठक्कर

मुले:

११ वर्षांंखालील: अभिमन्यू शेटे वि. वि. अगस्त्या समताने, १३ वर्षांंखालील: विवान वायंगणकर वि. वि. विवान गद्रे, १५ वर्षांंखालील: आदित्य पडवळ वि. वि. विहान राठी, १७ वर्षांंखालीलः ओम दाबेकर वि. वि. शोबीत कर्नक

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content