Homeपब्लिक फिगरपंतप्रधान मोदी 4...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील.

सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन मोदी आज आणि उद्या असे दोन दिवस सायप्रसचा अधिकृत दौरा करणार आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी सायप्रसला दोन दशकांपेक्षा जास्त काळाने दिलेली ही पहिलीच भेट असणार आहे. निकोसिया इथे पोहोचल्यावर पंतप्रधान मोदी ख्रिस्तोदौलिदीस यांच्याशी चर्चा करतील. लिमासोल इथे ते उद्योग-व्यवसाय क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांना संबोधित करतील. पंतप्रधान या भेटीतून दोन्ही देशांची द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची तसेच भूमध्य सागरी प्रदेश आणि युरोपीय महासंघासोबत भारताचे संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.

आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, पंतप्रधान मोदी, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरुन, G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 16 आणि 17 जूनला कॅनडामधील कॅनानास्किसचा दौरा करतील. पंतप्रधानांचा G-7 शिखर परिषदेतील हा सलग सहावा सहभाग असणार आहे. या परिषदेत, मोदी G-7 सदस्य देशांचे नेते, इतर आमंत्रित देशांचे प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांसोबत ऊर्जा, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊर्जा क्षेत्राची सांगड आणि क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात, पंतप्रधान मोदी क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान आंद्रेज प्लेंकोविच यांच्या निमंत्रणावरुन, 18 जूनला क्रोएशियाला अधिकृत भेट देणार आहेत. भारतीय पंतप्रधानांची क्रोएशियाला दिलेली ही पहिलीच भेट असणार आहे. या भेटीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे. आपल्या क्रोएशिया भेटीत पंतप्रधान मोदी प्लेंकोविच यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील तसेच क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविच यांचीही भेट घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रोएशिया दौऱ्यातून भारताची युरोपीय महासंघामधील भागीदार देशांसोबतचे संबंध आणखी मजबूत करण्याची वचनबद्धताही अधोरेखित होणार आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content