Homeन्यूज ॲट अ ग्लांससायबर सुरक्षेसाठी क्विक...

सायबर सुरक्षेसाठी क्विक हीलचे विनामूल्य कवच

सीमापार येणाऱ्या सायबर धमक्यांचे प्रमाण वाढत असतानाच सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव असलेल्या क्विक हील टेक्नोलॉजिज लिमिटेडने अँटीफ्रॉडडॉटएआय या फसवणुकीला प्रतिबंध करणाऱ्या प्रमुख उपाययंत्रणेची फ्रीमियम आवृत्ती विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. सायबर जगातील घडामोडी, विशेषत: गंभीर स्वरूप धारण करत असलेल्या इंडो-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

AntiFraud.AI च्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ फोनवर दिसणारे घातक अॅप्सच नव्हे तर लपलेले किंवा “अदृश्य” अॅप्सही शोधून काढण्याची अनोखी क्षमता, ज्यामुळे हे अॅप सायबरसुरक्षा क्षेत्रामध्ये वेगळे ठरते. ही छुपी अॅप्स बरेचदा यूजरच्या अपरोक्ष काम करत असतात व फिशिंग, स्पायवेअर व आर्थिक फसवणुकीच्या हल्ल्यांमध्ये त्यांचा वापर करून घेतला जातो. AntiFraud.AI यूजर्सना अशाप्रकारच्या अॅप्सचे अलर्ट्स पाठवते आणि त्यांना सुधारात्मक कृती करण्यास मदत करते. त्यामुळे हे प्रत्येक मोबाइल यूजरसाठी संरक्षणाचे एक अत्यावश्यक कवच बनले आहे.

नागरिकांचे घोटाळे, स्पायवेअर्स आणि सायबर फसवणुकीपासून संरक्षण करण्याची तातडीची गरज ओळखून क्विक हीलने Freemium ऑफरिंगच्या रूपात ही उपाययोजना उपलब्ध केली आहे, ज्यातून अत्यावश्यक संरक्षक साधने विनामूल्य प्राप्त होतील याची खबरदारी घेतली गेली आहे. त्यामुळे ग्राहकांना निर्भयपणे डिजिटल व्यवहार करण्याची हमी मिळावी. या सुविधेमध्ये घातक अॅप (छुपे आणि उघड दोन्ही) समोर आणण्यासाठी फ्रॉड अॅप डिटेक्टर, स्कॅमपासून संरक्षण, फ्रॉडचा धोका किती आहे हे जाणण्यासाठी रिस्क प्रोफाइस असेसमेंट, कॉल फॉरवर्डिंग अलर्ट, बँकिंग फ्रॉड अलर्ट, पेई नेम अनाऊन्सर, फ्रॉड प्रोटेक्ट बडी आणि अनऑथोराइज्ड अॅक्सेस अलर्ट इत्यादी सुविधांचा समावेश आहे.

सायबर

क्विक हील टेक्नोलॉजिज लिमिटेडचे सीईओ विशाल साळवी म्हणाले की, सायबर सुरक्षा हा सर्वांचा मुलभूत अधिकार आहे असे क्विक हीलमध्ये आम्हाला ठामपणे वाटते. सध्याच्या तणावपूर्ण काळात, जिथे डिजिटल धमक्यांमध्ये खऱ्याखुऱ्या जगातील संघर्षाचेच प्रतिबिंब दिसत आहे, तिथे देशाच्या सोबत उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. AntiFraud.AI ची फ्रीमियम आवृत्ती सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून देत आम्ही आमची राष्ट्रीय कटिबद्धता – म्हणजे सायबर गुन्हेगार व घोटाळेबाजांच्या नवनवी रूपे धारण करणाऱ्या क्लृप्त्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक नागरिकांची मदत करण्याप्रतीची आपली बांधिलकी नव्याने सिद्ध केली आहे.

इंडियन सायबरक्राइम कोऑर्डिनेशन (१४सी)ने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार सायबर घोटाळ्यांमुळे झालेले नुकसान १७५० कोटी रुपयांवर पोहोचलेले असताना हा उपक्रम भारताचे डिजिटल परिक्षेत्र सुरक्षित राखण्याच्या तातडीच्या गरजेशी सुसंगत आहे. २०२४च्या सुरुवातीला नॅशनल सायबरक्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर ७४०,०००हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. या निर्णायक वळणावर क्विक हीलने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्सना डिजिटल सुरक्षिततेली त्रुटी भरून काढण्यास मदत होईल.

Continue reading

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...
Skip to content