Homeब्लॅक अँड व्हाईटतब्बल ४० लाखांहून...

तब्बल ४० लाखांहून अधिक विकलं गेलेलं ‘पैशाचे मानसशास्त्र’!

पैशाचा योग्य वापर तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना! पैशाचे मानसशास्त्र, हे पुस्तक हेच सांगते. पैशाचे नियोजन, त्याची गुंतवणूक आणि धंद्यातील निर्णय या गोष्टींमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते. पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत. ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात… जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात अप्रत्यक्षपणे भाग घेत असतात. पैशाचे मानसशास्त्र, या पुस्तकात लोकं पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात याविषयी लेखक १९ गोष्टी सांगत आहेत. शिवाय आयुष्यातील महत्त्वाच्या विषयांपैकी एक अशा ‘पैसा’ या विषयावर महत्त्वाचे धडे देत आहेत.

या पुस्तकात २० प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरण तुम्हाला पारंपरिक विचारांना धक्का देणारे असेल कदाचित. पण पैशाच्या मानसशास्त्राचे हे वैशिष्ट्य आहे. किंबहुना तेच त्याचे काम आहे. प्रत्येक प्रकरण हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. पण सगळी प्रकरणे एकमेकास पूरक आहेत. त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रकरण स्वतंत्ररीत्या वाचू शकता. हे पुस्तक फार काही जाडजूड नाही. तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. बऱ्याचदा वाचक पुस्तक वाचून संपवत नाहीत, कारण प्रत्येक मुद्यावर तीनशे-चारशे पाने लिहिली जातात. हे वीस मुद्यांवर थोडक्यात पण मुद्देशीर लिहिले आहे, पण जाडजूड पुस्तक न वाचण्यापेक्षा ते बरे! नाही का?

पैशाचे मानसशास्त्र

लेखक: मॉर्गन हाऊजेल

अनुवाद: जयंत कुलकर्णी

प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन

मूल्य- २५० ₹. / पृष्ठे- २२४

सवलतमूल्य- २२५₹.

टपालखर्च- ५० ₹.

मानसशास्त्र

संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

Continue reading

ताणतणाव, नातेसंबंध उलगडणारे ‘झाले जलमय…’!

झाले जलमय... लेखिका डॉ. सुचिता पाटील सर्वद फाऊंडेशन आणि नरेश राऊत फाऊंडेशनच्या संचालिका आहेत. या संस्थेमार्फत लेखिका आदिवासी बंधूभगिनींच्या कल्याणासाठी काम करीत आहेत. त्यामुळे या पुस्तकाचे सर्व पैसे आदिवासी, गरीब मुलांसाठी दिले जाणार आहेत. डॉ. सुरुची डबीर यांनी आपल्या प्रस्तावनेत...

अशी आहे रा. स्व. संघाची शतकी वाटचाल

संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०:...

.. आणि दिवाळी अंकाबाबत झालेली चर्चा फक्त चर्चाच राहिली!

परवा ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता मोबाईल वाजला. दचकून जागा झालो आणि फोनवरचे बोलणे ऐकल्यावर कानावर विश्वासच बसला नाही. माझा परममित्र आणि ग्रंथ संवाद डिजिटल साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक जितेंद्र जैन तथा पप्पू याचे निधन झाले होते. दोनच दिवसांपूर्वी माझे...
Skip to content