Homeकल्चर +'मिशन मुंबई'च्या चित्रिकरणाला...

‘मिशन मुंबई’च्या चित्रिकरणाला सुरुवात

ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. “मिशन मुंबई” हा शोध, थरारक आणि ॲक्शन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्याच्या घडीला या चित्रपटाला एक्शनपट म्हणता येईल. कारण, यामध्ये सुमधूर संगीतासोबत एक्शनचा भडीमार आहे, जो आताच्या प्रेक्षकांना हमखास खिळवून ठेवेल. रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत या चित्रपटाचा मुहूर्त अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.

नव्या दमाचे कलाकार, सशक्त पटकथा, आणि मुंबईच्या मिशनवर आधारित दमदार कथा या चित्रपटात प्रेक्षकांना नक्की पाहयला मिळेल. या चित्रपटाच्या मुहूर्ताला प्रसिद्ध अभिनेता अजय शर्मा, विजय पाटकर, ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत कराड, सिद्धेश आचरेकर, शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी पंधे, किरण चव्हाण, फाईट मास्टर

फय्याज सय्यद तसेच दिग्दर्शक कैलाश पवार आणि चंद्रकांत विसपुते, मच्छिंद्र कदम, दिग्दर्शक शिरीष राणे, राजेश पाटील, श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक नितीन कांबळी, नयन पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

“मिशन मुंबई” चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता अजय शर्मा असून विजय पाटकर, आनंद जोग, सुरेखा कुडची हे कलाकार प्रमुख भूमिकेत असतील. शिवाय ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत, सिद्धेश आचरेकर शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी पंधे, किरण चव्हाण हे कलाकारदेखील या चित्रपटात असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार आणि चंद्रकांत विसपुते यांनी केले आहे. चित्रपटाची कथा चंद्रकांत विसपुते यांची असून पटकथा व संवाद मच्छिंद्र कदम यांचे आहेत. छायाचित्रण नंदलाल चौधरी यांचे असून मेकअप किशोर पिंगळे करत आहेत. संगीताची धुरा समीर खोले सांभाळत असून फाइट मास्तर फय्याज सय्यद फाइटिंग एक्शनचा भाग करत आहेत.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content