Monday, February 3, 2025
Homeचिट चॅटराज ठाकरे करणार...

राज ठाकरे करणार पुराणिक स्मृती महिला क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन!

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा माहीम ज्युवेनाईल व एसपीजी खेळपट्टीवर नामवंत १६ महिला संघांच्या सहभागाने रंगणार आहे. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन विरुध्द डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स यामधील उद्घाटनीय लढत मंगळवारी सकाळी ८.३० वा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल देऊन सुरु होईल. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक व जनरल सेक्रेटरी अभय हडप तसेच अपेक्स कमिटी सभासद उपस्थित राहणार आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेतील प्रतिष्ठेचा प्रकाश पुराणिक स्मृती चषक पटकाविण्यासाठी दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, राजवाडी क्रिकेट क्लब, फोर्ट यंगस्टर्स, डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स, पय्याडे स्पोर्ट्स क्लब, साईनाथ स्पोर्ट्स क्लब, दहिसर स्पोर्ट्स क्लब, ग्लोरीयस क्रिकेट क्लब, रिगल क्रिकेट क्लब, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब, भारत क्रिकेट क्लब, माटुंगा जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब, स्पोर्टिंग युनियन क्लब, पालघर-डहाणू स्पोर्ट्स आदी महिला संघांमध्ये चुरस होईल. बाद पध्दतीने होणाऱ्या स्पर्धेची अंतिम फेरी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वा. माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर होईल. अंतिम विजेत्या संघास रोख रु. ५०,०००/- व चषक, उपविजेत्यास रु. २५,०००/- व चषक आणि उपांत्य उपविजेत्या दोन्ही संघास प्रत्येकी रु. १५,०००/- पुरस्कार तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस रु. १०,०००/-, उत्कृष्ट फलंदाज रु. ५,०००/-, उत्कृष्ट गोलंदाज रु. ५,०००/- व उदयोन्मुख खेळाडूस रु. ५,०००/- पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती माहीम जुवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे खजिनदार महेश शेट्ये यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...

जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त दोन दिवसांचा ‘साहित्यरंग’!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने साहित्यातील प्रेमरंग, या विषयावर साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या शनिवारी, ८ फेब्रुवारी आणि रविवारी, ९ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या गोखले सभागृहात होईल. ८ फेब्रुवारीला थोर साहित्यिक जयवंत दळवी यांच्या...

जाणून घ्या वसंत पंचमीचा इतिहास, महत्त्व आणि मान्यता!

आज वसंत पंचमी! माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. त्यामुळे विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो. सर्व ऋतूंचा राजा असणार्‍या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या...
Skip to content