Wednesday, February 5, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजअखेर 'रॉ'ने फाडला...

अखेर ‘रॉ’ने फाडला सीबीआय अधिकाऱ्याचा बुरखा!

अखेर सीबीआय अधिकाऱ्याचा बुरखा ‘रॉ’ने फाडला! यावरून राज्यातील अनेक अधिकारी ‘रॉ’च्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले. सीबीआय अधिकारी ब्रिजमोहन मीना यांना ६० लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पकडल्यानंतर लगेचच रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून साधे प्रसिद्धीपत्रकही काढले गेले नाही, याबाबत विविध तपासयंत्रणांध्ये अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. संतापजनक बाब म्हणजे हे प्रकरण रफादफा करण्यासाठी याआधीच संबंधित बिल्डरकडून सुमारे दोन कोटी रुपये लाच घेतल्याची माहितीही उघड झाली आहे. चीड आणणारी गोष्ट म्हणजे अटक झाल्यानंतर सीबीआयने मीना यांच्या मुंबईतील घराची झडती घेतली असता प्रचंड मोठ्या प्रमाणात रोकड हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

अटक केल्यानंतर मीना यांना दिल्लीला घेऊन जाण्यात आले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे समजते. बँक व्यवहारातील गैरप्रकार शोधण्यासाठी जे सीबीआयचे युनिट आहे त्याचे प्रमुख कार्यालय दिल्लीला असल्याने मीना यांना दिल्लीत नेले आहे. हा बिल्डर मुंबईतील असून याआधीच या बँक गैरप्रकारप्रकरणी काही कारवाई होऊ नये म्हणून बिल्डरने मीना यांना तब्बल दोन कोटी रुपये दिले असल्याचे समजले. मीना यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून राजकीय तसेच आयपीएस लॉबीनेही शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे दिल्लीच्या लोधी परिसरात बोलले जात आहे. ही कारवाई सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी हक यांनी केली असून याकामी अधीक्षक कदम यांनी हक यांना सहकार्य केले. राज्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांपैकी एक-दोन अधिकाऱ्यांनी मीना यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. बँक व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार तसेच रोखे गुंतवणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप त्या बिल्डरवर आहे. या संबंधात मुंबई येथील सीबीआय कार्यालय काही बोलत नाही.

‘रॉ’ने फाडला सीबीआय अधिकाऱ्याचा बुरखा

सीबीआय अधिकारी ब्रिजमोहन मीना यांना रांगेहाथ ६० लाख रुपयांची लाच घेताना पकडल्यावर आता हा अधिकारी हवालाद्वारे कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीत सामील असल्याचे समोर आले आहे. हवालाचे हे प्रकरण गेली सहा महिने ‘रॉ’च्या रडारवर होते. सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहाय्याने ‘रॉ’ गेली सहा महिने मीना, त्यांचे सहकारी, संबंधित बिल्डर व हवाला रॅकेटवाले यांची टेलिफोनवरील संभाषणे बारकाईने ऐकत होती. या संभाषणातूनच कोट्यवधीचा हा बँक घोटाळा बाहेर आला. खरंतर ‘रॉ’ छोट्यामोठ्या घोटाळ्यात लक्ष घालतच नाही. मात्र हा घोटाळा हजार-बाराशे कोटींच्या वर असल्यानेच अत्यंत गुप्तपणे ही कारवाई आखली गेली. अखेर दोन दिवसांनंतर सीबीआयने काल रात्री यासंबंधी प्रसिद्धीपत्रक जारी केले. मीना यांच्यासह आठ आरोपीना अटक करण्यात आली असून यातील चौघेजण मीनांचे नातेवाईक आहेत. मीनांच्या मुंबईतील घराबरोबरच राजस्थान, गुजरात, दिल्ली अशा सहा ठिकाणी छापे घालून रोकड रक्कम व कागदपत्रे सीबीआयने तब्यात घेतली आहेत.

दरम्यान, सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र केडरमधील सुमारे सहा वरिष्ठ अधिकारी ‘रॉ’च्या रडारवर असून त्यांच्या सर्व हालचाली व टेलिफोनवरील संभाषणे मॉनिटर केली जात आहेत. यातील बहुतांश अधिकारी राजकीय नेत्यांच्या जवळचे असल्याचेही सूत्रांनी सूचित केले. मीना यांच्याबरोबर हरीश अग्रवाल, किसन अग्रवाल, ऐश्वर्या राम मीना, मनीष सराफ, सुनीता सराफ व खुश नेटवर्कचे लोहारूका यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकारणी मीनांनी आधीच दोन कोटी रुपये घेतले असल्याचे उघड झाले होते. परंतु दोन दिवसांच्या झाडाझडतीत ही रक्कम सात कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज लोधी कंपाउंडमधील अधिकारी व्यक्त करत आहेत.

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

1 COMMENT

  1. कोणावर विश्वास ठेवायचा? म्हणून तर काळे धंदे करणाऱ्यांना किलन चीट मिळते

Comments are closed.

Continue reading

काय काय नाही पाहिले क्रॉफर्ड मार्केटच्या पोलीस प्रेसरूमने!

चार-पाच दिवसांपूर्वी मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात (महात्मा फुले मंडई असे नामकरण झालेले असले व त्यालाही अनेक वर्षे उलटून गेलेली असली तरी प्रचलित नाव क्रॉफर्ड मार्केट असेच आहे) गेलो होतो. तसे हुतात्मा चौक परिसरात अजून प्रसंगानुरूप जाणे होत असतेच. पण...

हा पाहा मालाड रेल्वेस्थानकाचा मेकओव्हर!

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाची दुरुस्ती वा मेकओव्हर गेली तब्बल सात-आठ वर्षे सुरु आहे. (काहींनी तर हे काम सुरु होऊन दहा वर्षे तरी झाली असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.) मालाड, कांदिवली व बोरिवली ही वाढणारी रेल्वेस्थानके आहेत हे...

बीडच्या आयपीएसला गायब केले, तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?

गेल्या २०/२५ वर्षांत बीड - परळी परिसरात याहूनही काळी कांडं घडली.. अहो आयपीएसला गायब केले गेले.. तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?.. "करा रे खुशाल करा हवा तो राडा धमाल करण्याचा जमाना आहे बिनधास्त करा, बलात्कार -भ्रष्टाचार - अत्याचार - भरसभेत -...
Skip to content