Homeचिट चॅटआंतरशालेय जंप रोप...

आंतरशालेय जंप रोप स्पर्धेत आशनी, योगिता, झाकीर, स्वयंमला सुवर्ण

मुंबईच्या चेंबूर येथील दि ग्रीन एकर स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात आशनी काळे (लोरोटो कॉन्व्हेट), योगिता सामंत (के. जे. सोमय्या कॉलेज) आणि मुलांच्या याच गटात झाकीर अन्सारी, स्वयंम कांबळे (दोघेही साधू वासवानी हायस्कूल) यांनी सुवर्णपदके जिंकली. ४×४ स्पीड रिले शर्यतीत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात साधू वासवानी हायस्कूलने पहिला क्रमांक मिळवला. सुवर्णपदक विजेत्या संघात रितू शिंदे, जयानी अंबोरे, प्रिया सोनी, स्नेहा प्रजापती यांचा समावेश होता.

मुलांच्या याच गटात याच रिले शर्यतीत ऋषीकुल विद्यालय, घाटकोपर (पूर्व) यांनी अव्वल क्रमांक मिळवला. सुवर्णपदक विजेत्या ऋषीकुल विद्यालय संघात युग पटेल, मान पटेल, मान मारु, नम्रा वसंत या चौघांचा समावेश होता. स्पर्धेत पंच म्हणून अमन वर्मा, विदेश मोरे, पंकज कुमावत, ईशान पुत्रन यांनी काम पाहिले. मुंबई उपनगरातील शाळांचा सहभाग स्पर्धेत होता. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ प्रसिद्ध कुस्तीपटू, पॉवरलिफ्टर खेळाडू दिक्षा दिवे, ग्रीन एकर स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक कुणाल रहाते, ॲमॅच्युर जंप रोप संघटनेच्या वर्षा काळे आणि योगेश सांगळे या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content