Thursday, November 21, 2024
Homeचिट चॅटमुंबई जिल्हा कॅरम...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत प्रदीप मयेकर सलग सहा वेळा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. सरचिटणीसपदावर अरुण केदार, तर मानद खजिनदारपदावर संजय देसाई यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

२०२४ ते २०२७ या तीन वर्षांसाठी बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत निवडून आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

प्रदीप मयेकर (अध्यक्ष), धनंजय पवार (कार्याध्यक्ष), केतन चिखले आणि यतिन ठाकूर (उपाध्यक्ष), अरुण केदार (सरचिटणीस), अमोल शिंदे, संदेश कांबळे, संजय बर्वे (सहचिटणीस), संजय देसाई (खजिनदार), अनुपमा केदार, दिलीप सांडगे, परविंदरसिंग ग्रोवर, राजेश राणे, नितीन पारकर, सचिन घटकांबळे, संजय मोहिते, योगिता चिपळूणकर (सर्व कार्यकारिणी सदस्य).

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content