Sunday, September 29, 2024
Homeचिट चॅटएमजेएससी कॅरम स्पर्धेत...

एमजेएससी कॅरम स्पर्धेत रेहान शेख विजेता

मुंबईच्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माहीम ज्युवेनाईल चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सी फेस म्युनिसिपल स्कूलचा रेहान शेख विजेता ठरला. अचूक फटकेबाज खेळासह गेममधील सर्व बोर्डात राणीवर वर्चस्व राखत रेहान शेखने अंतिम फेरीमध्ये जोरदार मुसंडी मारणाऱ्या पोद्दार अकॅडमी हायस्कूल-मालाडच्या प्रसन्न गोळेचे आव्हान संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाच्या माहीम ज्युवेनाईल चषकाला गवसणी घातली.

विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्काराने एमजेएससीचे अध्यक्ष विजय येवलेकर, सेक्रेटरी राजन गुप्ता, उपाध्यक्ष विकास खानोलकर, खजिनदार महेश शेट्ये, कार्यकारी सदस्य प्रसाद कुलकर्णी, माजी क्रिकेटपटू सुरेंद्र बाबरेकर, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.

शिवाजी पार्क येथील माहीम ज्युवेनाईल पव्हेलीयनमध्ये उपांत्य सामन्यात रेहान शेखने कस्तुरबा गांधी स्कूलच्या सिध्दांत मोरेला नमविले. दुसरा उपांत्य फेरीचा सामना जनगणमन ज्युनियर कॉलेज-कोपरचा अथर्व म्हात्रे विरुध्द प्रसन्न गोळे अखेरपर्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या बोर्डाअगोदर ९-७ अशी आघाडी घेणाऱ्या अथर्व म्हात्रेला निर्णायक क्षणी सर्वांगसुंदर खेळ करीत प्रसन्न गोळेने १४-९ असे चकविले. उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार आयएनजी इंग्लिश स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा नील म्हात्रे, नारायण गुरु स्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलचा सम्यक पवार यांनी जिंकला. स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शालेय-कॉलेजमधील ३२ खेळाडूंनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘युरोकिड्स’चा नवा अभ्यासक्रम लाँच!

युरोकिड्स, या भारतातील आघाडीच्या प्रीस्कूल एक्सपर्ट कंपनीने त्यांच्या 'हेयुरेका', या दृश्य वैचारिक अभ्यासक्रमाची आठवी आवृत्ती नुकतीच लाँच केली. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रोजेक्ट झिरोपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०शी सुसंगत सर्वसमावेशक विकासाचे धोरण ठेवणारा हेयुरेका अभ्यासक्रम लहान...

“धर्मवीर २”चा बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक धमाका

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला "धर्मवीर २" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२ लाखांचा गल्ला कमावला. २०२४ या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा हा पहिला मराठी...

माझी माऊली चषक शालेय कॅरम स्पर्धा ३ ऑक्टोबरपासून

मुंबईतल्या सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतर शालेय १६ वर्षांखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान दैवत रंगमंच, जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंड, भायखळा-पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १६ आकर्षक चषक-मेडल पुरस्कार दिले जाणार...
Skip to content