Wednesday, October 16, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजपॉमेल घोड्यावर स्वारी!

पॉमेल घोड्यावर स्वारी!

ऑलिम्पिक म्हणजे विविध खेळांमध्ये जागतिक प्राविण्याची चढाओढ असते. यातले बरेच खेळ आणि त्यांच्या स्पर्धा आपण बघितल्या आहेतच. परंतु सामान्य ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांपेक्षा दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये कसरतपटूंची कामगिरी अधिक कठीण असते, कारण आपल्या शरीरातील उणीव आपल्या दुर्दम्य असा आशावाद आणि मेहनत यांच्या बळावर ते भरून काढतात आणि त्यानंतर आपल्या कलेचे प्रदर्शन दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये करायला मिळते आणि त्यात यश मिळाले तर अशा खेळाडूंना आनंदाचे भरते आले नाही तरच नवल…

असाच एक खेळ दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये आहे आणि त्याचे नाव आहे ‘पॉमेल घोड्यावर स्वारी’. अर्थात ही केवळ स्वारी करून भागत नाही. कारण, हा घोडा खरा नसून लाकडाचा असतो आणि त्याच्यावर हाताने पकड करण्यासाठी दोन अर्धगोल लावले असतात. ‘पॉमेल’ नावाची कथा अशी की, प्राचीन काळी रोमन सैनिक आपल्या सैनिकी प्रशिक्षणाचा भाग म्हणून या लाकडी घोड्यावर स्वारी करण्याचा सराव करायचे. ‘पॉमेल’ हा शब्द फ्रेंच आहे आणि त्याचा साधारण अर्थ ‘तलवारीची मूठ’ किंवा ‘पकड’ असा होऊ शकेल.

२०२४च्या दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये या खेळात आपली कामगिरी दाखवायला सज्ज झालेल्या ज्या कसरतपटूची आज आपण ओळख करून घेणार आहोत तो दोन्ही डोळ्यांनी खूपच अधू आहे. याचे नाव स्टीफन नेडोरोस्किक आणि तो अमेरिकेतर्फे या स्पर्धेत आला होता. डोळ्यांनी अधू असल्यामुळे पॉमेल घोड्यावरील कसरत करीत असताना किती

एकाग्रता लागत असेल याचा आपण विचार करू शकतो. सामान्यपणे वावरताना स्टीफन काळा चष्मा वापरतो. त्यामुळे त्याच्या डोळ्यांची कल्पना येऊ शकत नाही. मात्र या स्पर्धेच्या वेळी जेव्हा त्याच्या नावाचा पुकारा झाला तेव्हा त्याने मैदानावर येण्यापूर्वी आपला चष्मा काढून फेकला होता.

स्टीफनला अधू आणि दिव्यांग करणाऱ्या रोगाचे नाव ‘टू आय सिंड्रोम’ असे आहे. यात व्यक्तीला स्पष्टपणे दिसू शकत नाही. त्यानेच एका मुलाखतीत असे म्हटले होते की, त्याच्या रोगाचे नाव स्ट्राबिस्मस असे आहे आणि यात त्याचे दोन डोळे पूर्णपणे तिरळे आहेत. मात्र त्याने आपल्या सरावातून जो प्रभावी डोळा आहे त्याला कार्यक्षम करण्याची कला हस्तगत केली आहे. यावेळी त्याचे दोन्ही डोळे उघडे असतात असे तो म्हणतो हेही खासच. त्याने दिलेले उदाहारण असे की, केवळ दोन इंचावर असलेले दोन कॅमेरे आपल्या प्रत्येकातून वेगवेगळे चित्र दाखवू शकतात. हाच तो स्ट्राबिस्मस रोग… यामुळेच तो आपली दृष्टी एका डोळ्यावरून दुसऱ्या डोळ्यावर वळवू शकतो… हे सगळे जितके अद्भुत आहे तितकेच ते सांभाळायला आणि त्यावर दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करण्यासारखी कामगिरी नोंदवायला अतिशय कठीण आहे.

या संबंधात नेत्रतज्ज्ञ डॉ. विल्यम फ्लॅनरी यांचे म्हणणे असे की, या रोगामध्ये एक अथवा दोन्ही डोळे आतल्या बाजूला आपल्या नाकाकडे वळलेले असतात. यात मुख्यत्वेकरून स्नायू अथवा मज्जातंतूंचा परिणाम असू शकतो. दोन्ही डोळे वेगेवेगळे काम करतात हेही विशेषच. डॉ. विल्यम फ्लॅनरी पुढे म्हणतात की, या लोकांची दूरची दृष्टी चांगली असते. जवळचे स्पष्ट दिसण्याचा प्रश्न असतो… आणि इतके सगळे असूनही दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळवणारा हा कसरतपटू नृत्यपटूदेखील आहे आणि अमेरिकन टेलीव्हिजनवरील एका कार्यक्रमात त्याने अव्वल नृत्य कलाकारांना उत्तम साथ दिली आहे. 

Continue reading

एक चित्र हजार शब्दांचे… 

एक चित्र जे सांगू शकेल ते हजार शब्दही व्यवस्थित सांगू शकणार नाहीत, अशी एक चिनी म्हण आहे आणि ती अनेकदा आपल्या प्रत्ययालासुद्धा येत असते. जे ऐकले त्याचा जेवढा परिणाम होत नाही तितका परिणाम तेच पाहिले तर अधिक होतो हेही...

बाटलीबंद पाणी पिताय? सावधान!

जगाच्या एकूण ७९५ कोटींच्या लोकसंख्येतील २०० कोटी लोक बाटलीबंद पाणी पितात असा आताचा अंदाज आहे. यापैकी काहींना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर ही पाळी येते तर इतरांना बाटलीतले पाणी पिणे हे सधन असल्याचे लक्षण म्हणून आणि त्याशिवाय एक...

निवृत्तीकाळ दिव्यांग खेळाडूंचा..

आपण दिव्यांग असावे असे कुणालाही वाटणार नाही आणि ज्यांचा जन्मच दिव्यांग म्हणून झाला आहे त्यांना समज येईपर्यंत त्यांच्या पालकांची अवस्था काय होत असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्या कुटुंबातील दिव्यांगाला समाजात योग्य स्थान...
Skip to content