१६व्या जयपूऱ चित्रपट महोत्सवात ‘दाल रोटी’ चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार चित्रपटाच्या दिग्दर्शिका ज्युली जास्मिन यांनी राजस्थानचे माजी मुख्य सचिव निरंजन आर्य, बी. एस. रावत, होनू रोज आदी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा चित्रपट येत्या ६ सप्टेंबरपासून देशभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची इफ्फी २०२४च्या महोत्सवासाठीदेखील निवड झाली आहे. प्रसिद्ध निर्माते सलीम या चित्रपटाचे निर्माते असून ज्युली जास्मिन दिग्दर्शिका आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करून त्यांची सोडवणूक करण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट देशातील शेतकरी आणि जनतेसाठी शेती तसेच देशभक्तीचा संदेश देणारा आहे.