Saturday, November 9, 2024
Homeबॅक पेजराज्य कॅरम स्पर्धेत...

राज्य कॅरम स्पर्धेत पुण्याच्या पुरुष संघाला‌ विजेतेपद

मुंबईतल्या सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर येथे सुरू असलेल्या ५८व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक गटाचे विजेतेपद पुण्याने पटकाविले.

पुण्याच्या अनिल मुंढे याने मुंबईच्या महम्मद घुफ्रानवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे चुरशीच्या लढतीत तीन सेटनंतर पुण्याच्या रहिम खानने मुंबईच्या विकास धरियावर विजय नोंदविला. पुण्याच्या योगेश परदेशी आणि सागर वाघमारे या दुहेरीच्या जोडीने मुंबईच्या संदीप देवरुखकर व फहिम काझी जोडीवर चुरशीचा विजय मिळवत पुण्याला ३-० असे विजेतेपद मिळवून दिले.

पुरुष सांघिक गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी  झालेल्या लढतीत मुंबई उपनगरचा संघ वरचढ ठरला. त्यांच्या मंगेश पंडितने ठाण्याच्या महम्मद ओवेस अन्सारीला नमविले. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या सज्जाद शेखने ठाण्याच्या समीर अन्सारीला हरविले. दुहेरीच्या लढतीत विश्वनाथ देवरुखकर व विवेक कांबळे जोडीने ठाण्याच्या दीपक गनिका आणि महेश शेट्ये जोडीला नमवून आपल्या संघाला ३-० असा एकतर्फी विजय मिळवून दिला.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content