पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्णपदकाची आशा असलेला भालाफेकपटू नीरज चौप्रा याने आज मध्यरात्रीनंतर झालेल्या फायनलमध्ये तमाम भारतीयांची निराशा केली. ८९.४५ मीटर लांब भाला फेकून त्याने रौप्यपदक पटकावले. मात्र सुवर्णपदकाने त्याला हुलकावणी दिली. पाकिस्तानचा अर्षद नदीम याने ९२.९७ मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटर लांब भाला फेकत कांस्यपदक मिळवले.
फायनलमध्ये नीरज चोप्राला आज सूरच लागत नव्हता. पहिल्या प्रयत्नातच त्याचा फाऊल झाला. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तो सावरला आणि त्याने ८९.४५ मीटर दूर भाला फेकत आपले रौप्यपदक निश्चित केले. पाकिस्तानच्या अर्षदने मात्र पहिल्याच प्रयत्नात ९२.९७ मीटर भाला फेकत आपले वर्चस्व दाखवून दिले. त्याला मात देण्याच्या प्रयत्नात नीरजने नंतर चार प्रयत्न केले. मात्र यातल्या एकाही प्रयत्नात त्याला यश आले नाही. त्याचे सर्व प्रयत्न फाऊल झाले. अर्षदनेही आपला हा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न केला. पण तो फक्त एकदाच ९० मीटरच्या पुढे गेला. उरलेल्या वेळी एकदा त्याचा फाऊल झाला तर इतर वेळी त्याला ८८, ८९ मीटरपर्यंतच जाता आले.
गेल्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने याच प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते.
अभिनंदन इंडिया!