Homeब्लॅक अँड व्हाईटफिल्म मार्केटमध्ये प्रवेशिका...

फिल्म मार्केटमध्ये प्रवेशिका पाठवा १६ ऑगस्टपर्यंत

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत ५५व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे. महामंडळाने १ ऑगस्ट २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या चित्रपटांच्या प्रवेशिका मागविल्या असून निर्मात्यांनी विहित नमुन्यातील प्रवेशअर्ज १६ ऑगस्ट २०२४पर्यंत महामंडळाच्या जनसंपर्क विभागात अथवा gfffm2024@gmail.com या ई-मेलवर सादर करायच्या आहेत. जास्तीतजास्त चित्रपट निर्मात्यांनी प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे.     

मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे त्यांना आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मागील आठ वर्षांपासून गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये शासनाच्या वतीने महामंडळ सहभागी होत आहे. यंदाही महामंडळ सहभागी होणार असून चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. याबाबतची अधिक माहिती महामंडळाच्या www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content