Friday, November 22, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजरोजच्या प्रदूषणावर 'बांबू...

रोजच्या प्रदूषणावर ‘बांबू लावणे’ हाच उपाय! 

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बांबू लागवड यांचा काय संबंध आहे, असा प्रश्न विचारला तर कदाचित राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे उत्तर नसेल.. पण तरीही राज्यात बांबू लागवडीला प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जाणार आहे.

अजित पवार यांनी ही घोषणा शुक्रवारी त्यांच्या ६३ मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली आणि दहा हजार हेक्टर (पंचवीस हजार एकर) खासगी क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे, हेही जाहीर केले. या योजनेअंतर्गत बांबूच्या एका रोपापोटी बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला १७५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. सुरुवातीला नंदूरबार जिल्ह्यात एक लाख वीस हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे.

बांबू

अजित पवार यांनी ही घोषणा केली खरी पण त्यातील बांबूच्या उल्लेखानंतर सभागृहात हंशा उसळला. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे बघत खुणेनेच त्यांना इशारा केला की बघा, अर्थमंत्री काय सांगताहेत.. त्यावर खुणेनेच मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिले की हे जे काही आहे, ते तुमच्यासाठीच आहे.. त्यावर सभागृहात पुन्हा हंशा उसळला आणि अजित पवार मात्र गंभीरपणे त्यांचे लेखी भाषण वाचत बांबू लागवडीच्या प्रोत्साहनाचा प्लान वाचत होते.

अर्थसंकल्पानंतरच्या पत्रकार परिषदेतही बांबू लागवडीचा विषय चर्चिला गेला. शिवसेनेचे संजय राऊत यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी त्यांच्यावर टीका केली. बांबू लागवडीचा उल्लेख करत ते म्हणाले की, रोज सकाळी सकाळी महाराष्ट्रात प्रदूषण सुरू होते.. म्हणजे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणही सुरू होते. बांबू इतर वनस्पतींपेक्षा २० टक्के जास्त प्राणवायू सोडतो आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतो. त्यामुळे या रोजच्या प्रदूषणावर बांबूमुळे उपाय होऊ शकेल.

बांबू

संजय राऊत यांच्या सर्व टिव्हीवाल्यांना बाईट देत सुरू होणाऱ्या दिवसाचा संदर्भ मुख्यमंत्र्यांच्या दैनंदिन प्रदूषण या शब्दाला होता. त्यामुळे पत्रकार परिषदेतही पुन्हा एकच हंशा उसळला.

Continue reading

मराठा आरक्षणाला काँग्रेसचाच विरोध!

आमच्या सरकारने सत्तेवर येताच दिलेले दहा टक्के मराठा आरक्षण रद्द व्हावे, यासाठी न्यायालयात गेलेली व्यक्ती कॉँग्रेसवालीच आहे, असे सांगून मराठा आरक्षणाला कॉँग्रेसवालेच विरोध करताहेत, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर...

महायुतीचा कोथळा वाचवण्यासाठी महाराष्ट्रात वाघनखांचा उत्सव

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफझलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला आणि या इतिहासापासून प्रेरणा घेत राज्यातील महायुती सरकार आता येणाऱ्या निवडणुकीत स्वतःचा कोथळा वाचवण्यासाठी वाघनखांचा उत्सव महाराष्ट्रातल्या चार प्रमुख शहरांमध्ये भरवणार आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा कोथळा काढला गेला हा...

कुत्ता गोली कुत्ती गोलीपेक्षा असते भारी..

वास्तविक, अंमली पदार्थाच्या सेवनानंतर कोणत्याही व्यक्तीला नशा चढते आणि त्या व्यक्तीचे भान हरपते. भान हरपल्यानंतर त्या व्यक्तीला कोणतेच भान उरत नाही. पण अंमली पदार्थांमध्येही लिंगविशिष्ट विभागणी आहे आणि कुत्ता गोलीपेक्षा कुत्ती गोली किंवा कुतिया गोलीच्या सेवनाने नशा कमी प्रमाणात...
Skip to content