Friday, December 27, 2024
Homeचिट चॅटयंदा प्रत्यक्ष करसंकलनात...

यंदा प्रत्यक्ष करसंकलनात 20.99% वाढ

चालू 2024-25 या आर्थिक वर्षासाठी (17.06.2024 पर्यंत ) प्रत्यक्ष करसंकलनाचे तात्पुरते आकडे पाहिल्यास मागील आर्थिक वर्षाच्या (म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24) संबंधित कालावधीतील 3,82,414 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी निव्वळ संकलन 4,62,664 कोटी रुपये झाले असून ही वाढ 20.99% आहे.

निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 4,62,664 कोटी रुपये (17.06.2024 रोजी) असून यात कॉर्पोरेशन कर (CIT) 1,80,949 कोटी रुपये, प्रतिभूती व्यवहार करासह वैयक्तिक प्राप्तिकर 2,81,013 कोटी रुपये (निव्वळ परतावा) समाविष्ट आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष करांच्या एकूण संकलनाचे तात्पुरते आकडे (परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) 5,15,986 कोटी रुपये आहेत जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 4,22,295 कोटी रुपये होता आणि आर्थिक वर्ष 2023-24च्या संकलनाच्या तुलनेत यात 22.19% वाढ दिसून येते.

आर्थिक वर्ष 2024-25मध्ये 17.06.2024पर्यंत 53,322 कोटी रुपये परतावा रक्कम जारी करण्यात आली आहे जी मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यापेक्षा 33.70% अधिक आहे.

Continue reading

आंतरशालेय जंप रोप स्पर्धेत आशनी, योगिता, झाकीर, स्वयंमला सुवर्ण

मुंबईच्या चेंबूर येथील दि ग्रीन एकर स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात आशनी काळे (लोरोटो कॉन्व्हेट), योगिता सामंत (के. जे. सोमय्या कॉलेज) आणि मुलांच्या याच गटात झाकीर अन्सारी, स्वयंम कांबळे (दोघेही...

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...
Skip to content