Tuesday, December 24, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटवडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा...

वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर रा. स्व. संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले, असा निखालस खोटा आरोप केल्याबद्दल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

याविषयी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे कायदा विभागाचे संयोजक ॲड. अखिलेश चौबे यांनीही मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. चौबे यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध धार्मिक वैमनस्य निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.

भाजपाने दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यासंदर्भात ॲड. उज्ज्वल निकम यांच्याविरोधात अत्यंत खोटे, बदनामीकारक आरोप केले आहेत. त्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात आपल्या प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या असंख्य योद्ध्यांच्या बलिदानाचीही वडेट्टीवार यांनी क्रूर थट्टा केली आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांमुळे ॲड. निकम यांची बदनामी झाली आहे. त्याचबरोबर निवडणूक आचारसंहितेचेही उल्लंघन झाले आहे.

वडेट्टीवार यांच्या विधानाबाबत काँग्रेसकडून अद्याप कसलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. याचा अर्थ काँग्रेस पक्षाची वडेट्टीवार यांच्या आरोपांना संमती आहे,असे दिसते. वडेट्टीवार यांच्या विधानांमुळे भारतीय दंडसंहितेतील देशद्रोहासंदर्भातील कलम 124 अ आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 123 (4)चे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांना बिनशर्त माफी मागण्याचे आदेश द्यावेत. वडेट्टीवार आणि काँग्रेसविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत आणि निवडणुकीच्या उर्वरीत कालावधीत वडेट्टीवार यांना प्रचार करण्यास बंदी करावी आदी मागण्याही भाजपाने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content