Homeन्यूज अँड व्ह्यूजशिजवलेल्या अन्नाच्या दरात...

शिजवलेल्या अन्नाच्या दरात गेल्या 5 वर्षांत 71 टक्क्यांनी वाढ

राज्यातील प्रत्येक घरात शिजवण्यात येणाऱ्या अन्नाची दरवाढ गेल्या पाच वर्षांत सुमारे 71 टक्क्यांनी वाढ झालेली असून त्याच्या तुलनेत पगारात मात्र केवळ केवळ 37 टक्के इतकी कमी वाढ झाल्याने सर्वसामामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

या शिजवलेल्या अन्नात केवळ दोन वेळचे जेवण धरलेले आहे. सकाळचा चहानाश्ता, दुपारचा चहाबिस्किटे व संध्याकाळचा चहापाणी यांचा अंतर्भाव नाही. त्याचा खर्च समाविष्ट केल्यास ही टक्केवारी

80 टक्क्यांच्या घरात नक्कीच जाईल. सध्याचे सरकार आणि लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या मूळ मुद्द्याकडे लक्ष देऊन काही करण्याचे आश्वासन देण्याची खरेतर कधी नव्हे इतकी गरज आहे. राजकीय जुमलेबाजी काय केव्हाही केली जाऊ शकते.

यात बेरीजगारीचा उल्लेख नाही, नवीन घरे केवळ कागदावरच आहेत व त्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे केव्हाच पार केलेली आहेत. त्याहीपेक्षा चिंतेची बाब म्हणजे गेल्या 20/25 वर्षांत अनेक कारखाने, गिरण्या बंद पडलेल्या आहेत. तेथे नवीन उद्योग आलेले आहेत. मात्र तेथील हजारो जुन्या कामगारांना कोट्यवधी रुपयांची थकीत देणी अद्यापी मिळालेली नाहीत. काहींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत. परंतु तब्बल 20 वर्षांनीही न्यायाल्यालाही काही ‘पाझर’ फुटलेला नाही. तरीही सर्व न्यायाधीश व राजकीय नेते मात्र जोरशोरशे सांगत असतात “न्यायालयालाही मानवी चेहरा” असावा! हा चेहरा कुठे बरे मिळेल?

(आकडेवारी संदर्भ दि हिंदू यांच्या सौजन्याने)

Continue reading

सरकारच्या राजकारणावर उच्च न्यायालयाने ओतले पाणी!

मुंबई, ठाण्याच्या जवळ असलेली वसई-विरार महापालिका नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. अगदी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस व आता भाजपने विरारमधील ठाकूर बंधुच्या एकत्रित अंमलाला काबूत ठेवण्याचे वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. परंतु या दोन्हीही पक्षांना म्हणावे तसे यश प्राप्त झालेले...

ठाणे परिसरात दिसतोय ‘उडता पंजाब’!

ठाणे पोलीस दल गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांविरुद्ध मोहिमा राबवून कित्येक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करत असले तरी अंमली पदार्थांच्या व्यापाराचा 'आका' त्यांना अद्यापी मिळालेला नाही. ठाणे रेल्वेस्थानक परिसरात (पूर्व + पश्चिम) हे गर्दुल्ले ठाण मांडून बसलेले दिसत...

गुजरात विकासाचे असेही ‘विकसित वास्तव (मॉडेल)’!

मुंबईसारखीच परिस्थिती ठाणे शहर व आसपासच्या परिसराची झाली आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये! ती परिस्थिती म्हणजे परप्रांतीयांची घुसखोरी! हल्लीच्या भाषेत परप्रांतीय व स्थलांतरित या शब्दांना 'ग्लोबल' वेष्टन लावून विकण्याची पद्धत आहे. पण जे हे ग्लोबल लेबल...
Skip to content