Tuesday, December 24, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबईत 'कम्प्लायन्स अँड...

मुंबईत ‘कम्प्लायन्स अँड गव्हर्नन्स..’चे यशस्वी आयोजन

टीमलीज रेगटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स आणि द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्प्लायन्स अँड गव्हर्नन्स सिम्पोझियम’ नावाची एक परिषद मुंबईत नुकतीच आयोजित करण्यात आली.

या परिषदेमध्ये सेबी नियमन आणि प्रशासन प्रक्रियांमध्ये तंत्रज्ञानाच्या बदलत्या भूमिकांवर बोलण्यासाठी उद्योगक्षेत्रातील धुरंधरांची उपस्थिती लाभल्याचे दिसले. चर्चेसाठीच्या पॅनलमध्ये मॅरिकोचे कंपनी सेक्रेटरी व कम्प्लायन्स ऑफिसर विनय एमए; ईपीएल लि.च्या लीगल विभागाचे प्रमुख, कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर ओंकार आणि टीमलीज रेगटेकचे सहसंस्थापक आणि सीईओ ऋषी अग्रवाल यांच्यासारख्या विख्यात व्यावसायिकांचा समावेश होता. त्यांनी व्यवसाय करण्यात सुलभता येण्याच्या कामी तंत्रज्ञानातील प्रगतीच्या अविभाज्य भूमिकेवर प्रकाशझोत टाकला.

देशाच्या विविध उद्योगक्षेत्रांमध्ये नियमनांचे सुलभीकरण करण्याच्या आणि प्रशासनाचा दर्जा सुधारण्याच्या कामी रेगटेक क्षेत्राच्या लक्षणीय प्रभावाबाबत या बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. नियामक परिसंस्थेची दुसरी बाजू मांडत व्यावसायिक समुदायाच्या प्रतिनिधींनी नियमनांमधील जटिलतेविषयी कॉर्पोरेट क्षेत्राचा दृष्टिकोन व कायदेशीर नियमनांच्या पालनामधील तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका यावर चर्चा केली.

बीएसईचे एमडी आणि सीईओ सुंदररामन राममूर्ती यांनी चर्चेचा विषय प्रस्थापित केला. ते म्‍हणाले की, तंत्रज्ञानामुळे नियमनातील सुलभतेची हमी मिळते हे खरे आहे. मात्र त्याचबरोबर सध्याच्या सायबर धमक्यांच्या काळात सावध राहण्याची जबाबदारीही येते.

नियामकांकडून आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि नियमनांचा भार हलका करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ कशाप्रकारे घेतला जात आहे याविषयीच्या चर्चासत्राला सेबीच्या जनरल मॅनेजर रिचा गोएल अगरवाल, एनएसईचे व्हाईस प्रेसिडंट अविनाश नाईक; आयटी–सिडीएसएलचे सीनिअर व्हाइस प्रेसिडंट विश्वास नागले, एनएसडीएलच्या टेक्नोलॉजी विभागाचे व्हाइस प्रेसिडंट विशाल गुप्ता आणि एनएसईच्या इन्स्पेक्शन विभागाच्या व्हाइस प्रेसिडंट रेणू भंडारी या पाहुण्यांचा सहभाग लाभला.

टीमलीज रेगटेकचे सहसंस्थापक आणि सीईओ ऋषी अग्रवाल यांनी या चर्चासत्रादरम्यान आपला दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले की, अनुपालनाच्या जगामध्ये नियामत तंत्रज्ञानामध्ये परिवर्तन घडून येत आहे. यामुळे संस्थांना माहितीमधील असमतोल कमी करता येत आहे आणि तिच्यावरील नियंत्रण वाढविता येत आहे. फिक्की रेगटेक मंच सूचीबद्ध कंपन्यांसाठी अनुपालनातील सुलभता आणेल.

टीमलीज रेगटेकचे सह-संस्थापक आणि डिरेक्टर संदीप अग्रवाल यांनी सेबीला अनुपालनाच्या स्वयंचलित यंत्रणा पुरविणाऱ्या रेगटेक मंचांचे प्रात्यक्षिक सादर केले आणि तंत्रज्ञानामुळे कशाप्रकारे दृश्यमानता वाढू शकेल व अनुपालनाच्या कामांवरील नियंत्रण वाढू शकेल हे दाखवून दिले.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content