Homeहेल्थ इज वेल्थमानसिक आजारांबद्दलच्या जागृतीसाठी...

मानसिक आजारांबद्दलच्या जागृतीसाठी डॉ. बत्रांचे ‘फील गुड..’

प्रख्यात होमियोपथीतज्ज्ञ, डॉ. बत्राज हेल्थकेअर, या सर्वात मोठ्या होमियोपथी क्लिनिकच्या शृंखलेचे संस्थापक पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी आपल्या ‘फील गुड, हील गुड. स्टेइंग हॅप्पी विथ होमियोपथी’, या त्यांच्या १०व्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन केले. ब्लूम्सबरीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन

सोहळ्यात मानसिक व भावनिक आरोग्यावर अत्यंत उपयुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात मंदिरा बेदी, राजीव बजाज, मधू, झायेद खान आणि डॉ. आशीष कॉन्ट्रॅक्टर सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे संचालन तारा देशपांडे यांनी केले.

याप्रसंगी डॉ. बत्रा म्हणाले की, भावनिक आणि मानसिक आरोग्याने त्रस्त असलेल्या लोकांवर उपचार करतानाचे गेल्या ५० वर्षांतील अनुभव मी या पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकात प्रतिबंध, व्यसन न जडणारे आणि सुरक्षित उपचारपद्धत आणि चिंतातुरता, नैराश्य, एडीएचडी, तणाव, एकटेपणा इत्यादी समस्यांची चर्चा केली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून या फारशा चर्चा होत नसलेल्या समस्यांना हातळण्यासाठी जागरुकता निर्माण करणे, लोकांमध्ये चर्चा घडवून आणणे आणि उपचार देण्याचा मी प्रयत्न केला आहे.

सहा कोटींहून अधिक भारतीयांना गंभीर स्वरुपाच्या मानसिक आजारांनी ग्रासलेले आहे. दुर्दैवाने भारताला आत्महत्त्येची राजधानी म्हटले जाते. भारतात दर वर्षी २.६ लाखांहून अधिक आत्महत्त्येची प्रकरणे घडतात. ‘फील गुड, हील गुड. स्टेइंग हॅप्पी विथ होमियोपथी’ या पुस्तकाच्या माध्यमातून मानसिक व भावनिक आरोग्याच्या वाढत्या समस्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यात आली आहे आणि उपायही देण्यात आले आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशनाआधीच ॲमेझॉनवरील आरोग्य, फिटनेस आणि न्यूट्रिशन कॅटेगरीमधील पहिल्या दहा पुस्तकांमध्ये या पुस्तकाची वर्णी लागली आहे.

Continue reading

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...
Skip to content