Homeडेली पल्सबहुजन संग्राम संघटना...

बहुजन संग्राम संघटना आनंदराज आंबेडकरांच्या पाठिशी..

रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आणि इंदू मिल स्मारक लढ्याचे नायक असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर अमरावती येथे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरत आहेत. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत बहुजन संग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी आनंदराज यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे.

आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीच्या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांनीही पाठिंबा देऊन लोकसभेत निवडून पाठवावे, असे आवाहन चिलगावकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

येत्या मंगळवारी २ एप्रिल २०२४ रोजी आनंदराज आंबेडकर अमरावतीत आपला उमेदवारीअर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर आपण स्वतः बहुजन संग्रामच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या प्रचार सभांसाठी अमरावतीत जाणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Continue reading

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...
Skip to content