Homeटॉप स्टोरीरविवारी राहुल गांधी...

रविवारी राहुल गांधी फुंकणार निवडणूक प्रचाराचे रणशिंग

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज, मंगळवारी दुपारी २ वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. उद्या, १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्चला पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. रविवारी, १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होत असून याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात १५ जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली असून यात्रेची सांगता मुंबईत होत आहे. ही यात्रा १५ राज्ये, १०० जिल्हे, ११० लोकसभा मतदारसंघातून ६७ दिवसांत ६७००

किलोमीटरचा प्रवास करत आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक’ या घोषवाक्यासह ही यात्रा मार्गक्रमण करत आहे.

मागील वर्षी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४००० किमीची पदयात्रा काढली होती. या यात्रेला जनतेचे प्रचंड समर्थन लाभले होते तसाच भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्षाकडून भारत जोडो न्याय यात्रेत अडथळे आणण्याचा जाणीवपूर्क प्रयत्न केला गेला. पण यात्रा न डगमगता सुरुच राहिली. भारत जोडो न्याय यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जय्यत तयारी केली असून मुंबईत राहुल गांधी व न्याय यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेत व शिवाजी पार्क वरील जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना प़टोले यांनी केले आहे.

Continue reading

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....

टिव्ही पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज टेड टर्नर यांचे निधन

जगातील पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी 'सीएनएन' सुरू करून टेलिव्हिजन (टिव्ही) पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज माध्यम सम्राट टेड टर्नर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच निधन झाले. १९८०मध्ये त्यांनी 'केबल न्यूज नेटवर्क'ची स्थापना केली, ज्याने ठराविक वेळेत बातम्या देण्याच्या...

‘मेट गाला’मध्ये झाली सर्वात वाईट पोशाखाचीच चर्चा!

एआय वधू येत आहे का? असा प्रश्न पडावा. कॅटी पेरीने आपला चेहरा रोबोटसारख्या दिसणाऱ्या चंदेरी मास्कने पूर्णपणे झाकला होता आणि त्यावर तिने खांद्याविना, मोठा चौकोनी गळा असलेला पांढरा रेशमी गाऊन परिधान केला होता. पांढऱ्या सॅटिन ऑपेरा ग्लोव्हज घालून तिने...
Skip to content