Homeचिट चॅटदेसाई स्मृती कबड्डीत...

देसाई स्मृती कबड्डीत रिझर्व्ह बँकेची थरारक सलामी

प्रो कबड्डीच्या समाप्तीनंतर प्रभादेवीत सुरू झालेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषकानिमित्त विशेष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रिझर्व्ह बँकने मिडलाईन अ‍ॅकेडमी स्पोर्ट्सवर थरारक मात करत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे युनियन बँक, ठाणे महानगरपालिका आणि मुंबई बंदरनेही एकतर्फी सामन्यात सहजसुंदर विजयासह आपल्या गुणांचे खाते उघडले.

कबड्डीला आक्रमक करण्यासाठी आगळीवेगळी बक्षिसे ठेवलेल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनंत गिते, दिवाकर रावते, विभागप्रमुख आणि मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. रामदार गावकर आणि प्रमुख कार्यवाह महेश सावंत, क्रीडाप्रमुख चंद्रशेखर राणे, स्पर्धाप्रमुख रवी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेच्या प्रारंभीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विभागाचे आमदार-खासदार आणि मुंबईचे महापौर भूषविलेल्या मनोहर जोशी यांना सर्व कबड्डीपटू आणि कबड्डीप्रेमींनी आदरांजली वाहिली.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत सीताराम चव्हाण क्रीडा नगरीत मिडलाईन अ‍ॅकॅडमी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यात खेळला गेलेला सामना कमालीचा चित्तथरारक झाला. डावाच्या पहिल्या चढाईपासून दोघांमध्ये गुण मिळवण्यासाठी सुरू झालेली चढाओढ अखेरच्या चढाईपर्यंत दिसली. कासार आणि राक्षे यांच्या यशने उत्कृष्ट चढाया करत आरबीआयला १७-१३ अशी ४ गुणांची आघाडी मिळवून दिली. मिडलाईनच्या आदी तिथे आणि ऋषिकेश गागरे यांनी आरबीआयच्या गुणांची बरोबरी साधण्यासाठी जोरदार खेळ केला. उत्तरार्धात चढाई-पकडींचा खेळ चांगलाच रंगला होता. पण अखेर आरबीआयनेच ३६-३२ अशी सरशी घेत विजयी सलामी दिली.

ठाणे महानगरपालिका (टीएमसी) आणि रायगडच्या जेएसडब्ल्यू यांच्यातील लढत कबड्डीप्रेमींना थराराची मेजवानी देऊ शकली नाही. टीएमसीच्या जावेद, अनिकेत माने, विघ्नेश आणि मनोज बोंद्रे यांच्या खेळापुढे जेएसडब्ल्यूच्या खेळाडूंचे काहीएक चालले नाही. एकतर्फी आणि निरस लढतीत टीएमसीने जेएसडब्ल्यूवर चक्क चार लोण चढवत ४८- १७ असा दणदणीत विजय मिळविला.

युनियन बँक आणि सेंट्रल बँकेतील लढतही अत्यंत कंटाळवाणी झाली. सामन्याच्या पहिल्या चढाईपासून युनियन बँकेने घेतलेली आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली. आदित्य चोगले आणि आदित्य शिंदे यांनी केलेल्या खेळाने पहिल्या डावातच सेंट्रल बँकेवर दोन लोण चढवत २६-१० अशी निर्विवाद आघाडी घेतली. युनियन बँकेच्या झंझावातापुढे सेंट्रल बँकेचा जराही निभाव लागला नाही. परिणामी हा सामना ४५-२६ असा संपला. न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स आणि मुंबई बंदर (एमपीटी) यांच्यात झालेला सामना एमपीटीने ४३-३१ असा सहज जिंकला.

Continue reading

शालेय मुलांसाठी विनाशुल्क कबड्डी उन्हाळी शिबीर

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय मुलांसाठी विनाशुल्क कबड्डी स्पर्धात्मक प्रशिक्षण शिबीर मुंबई शहर व उपनगरमधील विविध विभागामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचा शुभारंभ कुर्ला-पश्चिम येथील गांधी मैदानात २५ एप्रिलपासून होणार आहे. नवोदित खेळाडूंना तंत्रशुध्द कबड्डी खेळाची...

मतदारसंघाच्या पुनर्रचनेमागे मोदी सरकारचा धूर्त डाव!

जनगणनेचा अहवाल २०२७मध्ये पूर्ण होणार आहे. घटनेतीलसंबंधीत कलमाप्रमाणे अनुसूचित जाती-जमाती व इतर समाजांना यथायोग्य प्रतिनिधित्व देण्याची तरतूद यामध्ये असताना वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या अहवालाऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या अहवालावर आधारित विधेयक, २९ एप्रिलपूर्वीच मंजूर करण्याचा घाट मोदी सरकार कशाकरिता घालत आहे असा सवाल...

भारतातला पहिला ई टीडीआर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पूर्ण क्षमतेने कार्यान्वित

राज्यशासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकारातून आणि मुंबई महापालिकेच्या सहकार्याने हस्तांतरणीय विकास हक्क (Transferable Development Rights-TDR) व्यवहारांसंदर्भातील भारतातील पहिले एकात्मिक डिजिटल व्यासपीठ म्हणजेच ई टीडीआर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आज, बुधवारपासून ही प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे. https://etdr.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ही...
Skip to content