Homeब्लॅक अँड व्हाईटशरीरसौष्ठवपटूंची ऑस्कर 'मुंबई...

शरीरसौष्ठवपटूंची ऑस्कर ‘मुंबई श्री’ ९ मार्चला!

मुंबईचे शेकडो शरीरसौष्ठवपटू वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात ती शरीरसौष्ठवाची श्रीमंती आणि पीळदार ग्लॅमर असलेली स्पार्टन न्यूट्रिशन ‘मुंबई श्री’ येत्या ९ मार्चला अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात होणार आहे.

मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या या स्पर्धेचे यंदाही न भूतो न भविष्यती असेच दिमाखदार आयोजन सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने करण्यासाठी शरीरसौष्ठव संघटनेने कंबर कसली आहे. स्पार्टन न्यूट्रिशन मुंबई श्रीचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्पर्धेला साजेसे असे व्हावे म्हणून  शिवसेनेचे सचिव तथा युवा नेते सिद्धेश कदम हेसुद्धा मुंबई श्रीच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मुंबईकर शरीरसौष्ठवपटूसाठी शरीरसौष्ठव खेळातील ऑस्कर असलेल्या या स्पर्धेचे यंदाही दिमाखदार आयोजन केले जाणार असल्याची ग्वाही बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर आणि किट्टी फणसेकर यांनी दिली.

मुंबई श्रीसारख्या स्पर्धेचे ग्लॅमरस आणि भव्य दिव्य आयोजन करता यावे म्हणून बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने यंदाही शहाजी राजे क्रीडा संकुलातच आयोजन करण्याचे ठरवले आहे.

सुमारे दहा लाखांच्या बक्षीसांचा होणार वर्षाव

शरीरसौष्ठवपटूंना श्रीमंत करणार्‍या या स्पर्धेत लौकिकानूसार किमान २०० खेळाडू सहभाग घेतील, असा प्राथमिक अंदाज असला तरी खेळाडूंचा प्रतिसाद पाहता हा आकडाही ओलांडला जाऊ शकतो. उमेश गुप्ता, उबेद पटेल, संतोष भरणकर, उमेश पांचाळ, अक्षय खोत, विशाल गिजे, विशाल धावडे, अभिषेक लोंढे, संकेत भरम, प्रणव खातू, अमेय नेवगे, अमित साटम, विलास घडवलेसारखे खेळाडू आपले मुंबई श्रीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील.

कुस्ती

गतवर्षी विजेत्याला सव्वा लाखांचे इनाम दिले गेले होते, तर यंदा त्यात २५ हजारांची वाढ करत ते दीड लाखाचे करण्यात आले आहे. तसेच द्वितीय आणि तृतीय विजेत्याला अनुक्रमे ७५ आणि ५० हजार रुपयांचे रोख इनाम दिले जाणार आहे. ही स्पर्धा एकंदर आठ गटात होणार असून गटातील अव्वल पाच खेळाडूंना अनुक्रमे १५, १२, १०, ८, ५ हजार असे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर पुढील पाच क्रमांकानाही एक हजारांचे उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाईल.

या स्पर्धेत खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्यामुळे वजन तपासणी ९ मार्चला स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते ०१.०० या वेळेत घेतली जाणार आहे. महिला खेळाडूंचा सहभाग दरवर्षी वाढत असल्याने महिला शरीरसौष्ठव व महिला फिटनेस फिजिक या स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.

फिटनेस फिजीक खेळाडूंनाही ‘मुंबई श्री’चे वेध

फिटनेसची क्रेझ अवघ्या मुंबापुरीत आहे. त्यामुळे सध्याची युवा पिढी मोठ्या संख्येने फिटनेस फिजीक प्रकाराकडे वळली आहे. या स्पर्धेत केवळ दोनच गट असले तरी या दोन गटात शंभरपेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. या गटातही खेळाडूंवर रोख बक्षीसांचा वर्षाव केला जाणार आहे, अशी माहिती सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व्यायामशाळा आणि स्पर्धकांनी विशाल परब- ८९२८३१३३०३, सुनील शेगडे- ९२२३३४८५६८, राजेश निकम- ९९६९३६९१०८, अब्दुल मुकादम- ७९७७३२१८८५ किंवा राम नलावडे- ९८२०६६२९३२ यांच्याशी संपर्क साधावा.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content