Saturday, July 6, 2024
Homeमाय व्हॉईसबाटाच्या किंमती आणि...

बाटाच्या किंमती आणि वित्तीय तूट..

बाटाच्या चपला किंवा बूट आणि राज्याचा अर्थसंकल्प, यांचा काय संबंध आहे… असे विधान केले तर कोणालाही आश्चर्य वाटेल. पण, आहे… राज्याच्या अर्थसंकल्पाचा बाटाच्या बुटांच्या, चपलांच्या किंमतीशी संबंध आहे.

राज्याचे अनेक अर्थसंकल्प सलगपणे मांडलेले माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी हा संबंध स्पष्ट केला. सध्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी जयंत पाटील यांनी या अंतरिम अर्थसंकल्पावर टीका केली. गेल्या अर्थसंकल्पापेक्षा या अंतरिम अर्थसंकल्पात तूट कमी दिसते. पण त्याचे कारण काही स्पष्ट होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

वित्तीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपयांची दाखवण्यात आली आहे, याकडे लक्ष वेधून जयंत पाटील म्हणाले की, हा आकडा खरे तर एक लाख कोटींच्याही पुढे असेल. पण, बाटाच्या दुकानात बुटाची किंवा चपलेची किंमत जशी ९९ रुपये असते, तशाच पद्धतीने ही तूट दाखवली गेली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी बसल्या जागी टिप्पणी करत अर्थमंत्र्यांनी अचूक आकडा दिला आहे, असे सांगितले. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, आकडा अचूक नाही तर मानसिक दिलासा देण्यासाठी तसा दिलेला आहे. पाटील म्हणाले की, बाटाच्या दुकानात ९९ रुपये किंमत असली की थोडा दिलासा मिळतो की चला शंभरच्या आत आहे. त्याचप्रकारे तुटीचा आकडा ९९ लाख २८८ कोटी म्हटले की एक लाख कोटींच्या आत आहे, असे वाटते. त्यासाठीच हा सारा खटाटोप आहे.

बाटा

ब्राह्मण समाजाला संपवण्याची भाषा

संपूर्ण ब्राह्मण समाजाला संपवण्याची भाषा करणाऱ्या योगेश सावंत यांना पोलीस ठाण्यातून सोडून द्यावे, यासाठी आमदार रोहित पवार यांनी फोन केला होता, असा आरोप आमदार राम कदम यांनी गुरुवारी विधानसभेत केला. संबंधित योगेश सावंत हा राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा सदस्य आणि पदाधिकारी असून या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश सरकारला दिले. मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे जाहीर केले.

आमदार राम कदम यांनी औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे राज्यातील सर्व ब्राह्मण समाजाला संपवून टाकण्याची भाषा करणाऱ्या योगेश सावंत यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी गुरुवारी विधानसभेत केली. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मराठा आरक्षणविषयक आंदोलनांमधील हिंसाचाराबद्दल यापूर्वीच एसआयटी चौकशी जाहीर झालेली आहे. पण अशा वेळी संपूर्ण ब्राह्मण समाजाला आणि देवेन्द्र फडणवीस यांना संपवून टाकण्याची धमकी दिली गेली, याबद्दल कडक कारवाई केली जावी, अशी मागणी कदम यांनी केली.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांचे नाव आमदार कदम यांनी घेतल्याने त्या गोष्टीला आक्षेप घेतला. त्यावर आमदार आशिष शेलार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत आमदार कदम यांनी शरद पवार यांचे नाव घेतलेले नसून राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गट, असा पक्षनावाचा उल्लेख केलेला आहे. आमदार रोहित पवार यांनी संबंधित योगेश सावंत याला सोडून द्यावे, असा फोन केला होता का, त्यांचा सावंत यांच्या वक्तव्याशी काय संबंध आहे, राज्यातल्या एका समाजाला संपवून टाकायची भाषा जाहीरपणे केली जाते, हे योग्य आहे का, अशा सर्व गोष्टींची चौकशी केली जावी, अशी मागणी शेलार यांनी केली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी या मुद्द्यावरून सभागृहात घोषणाबाजीही केली. विरोधी बाकांवर उपस्थित सदस्यांची संख्याही पुरेशी नसल्याने तसेच आमदार रोहित पवारही सभागृहात नसल्याने त्यांच्या बाजून फारसा विरोध केला गेला नाही.

Continue reading

यातले किती सदस्य पुढच्या जन्मी होणार फ्लेमिंगो?

पुढच्या जन्मी विधानसभेतील किती सदस्य फ्लेमिंगो पक्ष्याचा जन्म घेणार आहेत, हे मंत्रिमहोदयांनी सांगावे, अशी अजब मागणी आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. याचे उत्तर देण्यासाठी मला चित्रगुप्ताच्या संगणकाला एक्सेस लागेल, असे सांगून ही माहिती पटलावर ठेवता येणार नाही,...

एकदा सांगून तुमच्या डोसक्यातच शिरत नाही…

आम्ही काहीही केले किंवा महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे असं म्हटलं की तुम्ही नाही.. नाही.. नाही.. असं म्हणता. तुमच्या डिक्शनरीतून नाही.. नाही.. नाही.. हा शब्द काढून टाका आणि तिथं होय.. होय.. होय.. असा शब्द घाला, असा सल्ला अजित पवारांनी...

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे व्हा रे सारे खूष…

अजित पवार यांनी मुंबईत सध्या चालू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला, त्यावर विधानसभेत चर्चाही झाली. अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला त्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघाली. त्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या...
error: Content is protected !!