भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल आपल्या मुंबई भेटीत शिवसेनेचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा, या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सुमारे तासभर उभयतांमध्ये चर्चा झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीतल्या जागावाटपांवर चर्चा झाली असे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र निवडणूक जिंकण्याबाबतच्या डावपेचांवर यावेळी चर्चा झाल्याचे कळते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आदी नेते यावेळी उपस्थित होते.