Homeन्यूज अँड व्ह्यूजठाण्यातल्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे...

ठाण्यातल्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे बळावले मणक्यांचे आजार!

ठाणे शहरातील मुख्य व सेवा रस्त्यांबाबत नागरिकांच्या नेहमीच तक्रारी असतात. रस्त्यावरील खड्डे व उड्डाणं पुलांवरील टेंगुळे तसेच सांध्यावर बसणाऱ्या जर्कमुळे समस्त ठाणेकर हैराण झालेले आहेत. उज्वल उद्यासाठी मेट्रो येणार आहे. त्याचे स्वागतच आहे. पण मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले खड्डे महिनोमहीने तसेच ठेवल्याने हजारो ज्येष्ठ नागरिकांना मणकादुखीचे आजार बळावत असल्याचे अनेकांनी सांगितले.

छायाचित्रात दिसणारे खड्डे हे घोडबंदर रोडवरील आर मॉलच्या सेवा रस्त्यावरील आहेत. तेथे मेट्रोचे काम सुरु आहे हे मान्य आहे. पण हे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. म्हणून काय नागरिकांनी मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यन्त या खड्ड्यातूनच जायचे? याबद्दल ठाणे महापालिका व विकास प्राधिकरणाने एकदा खुलासा केलेला बरा! म्हणजे मग दररोज खड्ड्याबाबत कोणी तक्रार करणार नाही.

तसाही नागरिकांना बरेच आवंढे गिळण्याची सवय आहेच. त्यात आणखी एकाची भर पडली हे पाहून बापुडे नागरिक गप्प तरी बसतील. नगरविकास खात्याचे सचिव, प्राधिकरणाचे सर्वेसर्वा आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी संयुक्तपणे ठाण्यातील रस्त्यांची पाहणी करावी व संबंधित अभियंत्यांना कामाला लावावे अशी जनतेची मागणी आहे.

Continue reading

पूर्णेकर हत्त्येमागे भलताच अँगल?

ठाणे शहरातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्त्येस एक महिना उलटून गेल्यानंतरही सूत्रधार मिळत नसल्याने ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाटक रंगत आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. राजकीय नाटक, या...

बिष्णोई गँगच्या कारवायांमुळे दिल्लीतले अधिकारीही वैतागले!

आठ दिवसांपूर्वी रविवारी रात्री मुंबईत जुहूच्या पुष्पा पार्कजवळ प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर बिष्णोई गँगच्या गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबाराने मुंबई पोलीस सोडा, खुद्द केंद्रीय गृह मंत्रालयातील काही बडे अधिकारी संतापाने लालबुंद झाल्याची माहिती हाती आली आहे. खरंतर बिष्णोई गँगच्या कारवायांमुळे...

तळहाताला खाज सुटली आणि टायगरजवळ फुटले फटाके!

वर्षभरापूर्वी जुहूच्या मेहमूद चौकातील रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर लॉरेन्स बिष्णोईच्या गुंडानी अंदाधुंद गोळीबार केला होता व अवघ्या पाच मिनिटात तो समाजमाध्यमावर प्रसारितही केला गेला होता. अगदी तीच पद्धत काल रात्रीही पुष्पा पार्क येथे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा,...
Skip to content