Homeएनसर्कलखरंच राज्यसभा निवडणूक...

खरंच राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार?

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी निवडल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी आज सत्ताधारी तसेच विरोधकांकडून फक्त सहाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी अखेरच्या क्षणाला जगताप नावाच्या पुण्यातल्या एका पत्रकाराने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे छाननीच्या दिवशी ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण, पुण्यातल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि नांदेडचे अजित गोपछडे यांनी विधान भवनात भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. साडेचार वर्षांची मुदत शिल्लक असताना राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे तांत्रिक अडचण टाळण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी सध्याच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीच्या वतीने पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या वतीने अलीकडेच पक्षात दाखल झालेले काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकऱ बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते यावेळी उपस्थित होते.

काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात तसेच पक्षाचे बहुसंख्य आमदार यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ संपत असतानाच जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज वैध ठरण्यासाठी त्यावर किमान दहा आमदारांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे. अर्जाच्या छाननीत हे पाहिले जाईल. हा अर्ज वैध ठरल्यास काँग्रेसच्या हंडोरे यांच्या निवडीला धोका निर्माण होऊ शकतो. विधान परिषद निवडणुकीतही ऐनवेळी क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे हंडोरे यांचा पराभव झाला होता.

Continue reading

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...
Skip to content