Wednesday, January 15, 2025
Homeडेली पल्सराष्ट्रपतींनी जाहीर केले...

राष्ट्रपतींनी जाहीर केले जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, 31 जणांना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार – 2023 प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. यात 03 सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, 07 उत्तम जीवन रक्षा पदक आणि 21 जीवन रक्षा पदक यांचा समावेश आहे. तीन जणांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:-

सर्वोत्कृष्ट जीवन रक्षा पदक 

  1. मास्टर अँथनी वनमाविया (मरणोत्तर), मिझोरम 
  2. लोडी लालरेमरुती (मरणोत्तर), मिझोरम
  3. सूरज आर (मरणोत्तर), केंद्रीय राखीव पोलीस दल

उत्तम जीवन रक्षा पदक 

  1. साहिल भीसू लाड, गोवा 
  2. काजल कुमारी, झारखंड 
  3. नवीन कुमार डी, तेलंगणा 
  4. विनोद कुमार, सीमा रस्ते संघटना
  5. हवालदार शेरा राम, संरक्षण मंत्रालय
  6. मुकेश कुमार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल 
  7. नरेश कुमार, राष्ट्रीय तपास संस्था

जीवन रक्षा पदक

  1. एन एस अनिल कुमार, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
  2. जीतम परमेश्वर राव, आंध्र प्रदेश
  3. समरजीत बसुमतारी, असम
  4. सुदेश कुमार, चंडीगड
  5. जस्टिन जोर्ज, केरळ
  6. विल्सन, केरळ
  7. पद्मा थिंलेस, लद्दाख
  8. मोहम्मद अफजल, लद्दाख
  9. आदीका राजाराम पाटील, महाराष्ट्र
  10. प्रियंका भारत काळे, महाराष्ट्र
  11. सोनाली  सुनील बालोडे, महाराष्ट्र
  12. मारिया माइकल ए, तमिळनाडू
  13. एस विजयकुमार, तमिळनाडू
  14. नरेश जोशी, उत्तराखंड
  15. अर्जुन मलिक, सीमा रस्ते संघटना 
  16. अमित कुमार सिंह, सीमा सुरक्षा दल
  17. शेर सिंह, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
  18. सोनू शर्मा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
  19. अबदुल हमीद, संरक्षण मंत्रालय
  20. सुनील कुमार मिश्रा, संरक्षण मंत्रालय
  21. शशिकांत कुमार, रेल्वे मंत्रालय

एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याच्या मानवतावादी कृतीसाठी जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार प्रदान केले जातात. सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक या तीन श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. सर्व क्षेत्रातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. हे पुरस्कार मरणोत्तरदेखील दिले जातात. हा पुरस्कार (पदक, केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि एकरकमी आर्थिक भत्ता) पुरस्कार विजेत्याला केंद्रीय मंत्रालय/ संस्था/ राज्य सरकारद्वारे प्रदान केले जातात.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content