Homeहेल्थ इज वेल्थतंबाखूजन्य पदार्थ टाळा,...

तंबाखूजन्य पदार्थ टाळा, मौखिक आरोग्य सांभाळा…

मौखिक आजारांचा प्रार्दुभाव वाढत आहे. तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे कर्करोगाचे रुग्ण दिसत आहेत. यासाठी जनजागृती महत्त्वाची असून मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य, विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

फिरते दंत रुग्णालय हे शासनाच्या निधीतून झाले असून या रुग्णालयास जिल्हा नियोजन समिती, मुंबई शहर यांनीही सहकार्य केले आहे. मुश्रीफ यांच्या हस्ते सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाचे लोकार्पण आणि या चिकित्सालयाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन दंत वैद्यकीय महाविद्यालयात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भट, सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख संध्या डॉ. चव्हाण यांची उपस्थिती होती.

नाविन्यपूर्ण आधुनिक सुविधा असलेले सुसज्ज फिरते दंत रुग्णालय, स्टेट ऑफ आर्टस् या आधुनिक संकल्पनेवर आधारित आहे. त्यामुळे थेट जनतेपर्यंत पोहोचवून आधुनिक सेवा प्रदान करणे सहज शक्य होईल. प्राथमिक मौखिक आरोग्य सुविधा तसेच उत्तम उपचार अधिकाधिक सुलभ करून फिरते दंत चिकित्सालयाद्वारे जनतेपर्यंत पोहोचून सेवेचा अभाव असलेल्या दुर्गम भागांमध्ये जास्तीतजास्त सेवा पुरवावी व मौखिक रोगांचे प्रमाण कमी करावे. तसेच जनतेस मौखिक आरोग्याबद्दल संवेदनशील करणे, तंबाखू व्यसनामुळे वाढणारे मौखिक कर्करोग यावर जनतेस जागरुक करून मौखिक कर्करोगावर नियंत्रण आणणे हे सामाजिक दंत शास्त्र विभाग,शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई यांनी करावे , असेही त्यांनी सांगितले.

सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाची माहिती  

दंतचिकित्सालयात आधुनिक पद्धतीच्या दोन दंत खुर्च्या व यंत्रणा असून रुग्णसेवेसाठी तत्पर आहे. फक्त मौखिक तपासणी व उपचार याकरिताच नव्हे, तर आधुनिक उपचारपद्धती यंत्रणा जसे की पोर्टेबल एक्सरे युनिट, कर्करोग तपासणी, त्वरित आरोग्य चाचणी सुविधा यांनी सुसज्ज आहे. ज्यामुळे रुग्णांचे जागीच निदान करून त्वरित उपचार सेवा देणे सोपे होईल. दातांची कीड यावर उपचार व प्रतिबंध, हिरड्यांचे आजार यावर उपचार, रूट कॅनॉल उपचार, मौखिक कर्करोग तपासणी, व्हीडिओद्वारे रुग्णांचे मौखिक आरोग्य संबंधित जागरूकता, तंबाखू व्यसन समुपदेशन या सेवा पुरविल्या जातील.

यावेळी निवतकर, डॉ. पाखमोडे, डॉ. भट यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संध्या चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन अब्रार सय्यद यांनी केले, तर आभार प्रियांका मचाले यांनी मानले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content